फैजपूर प्रतिनिधी । ऐतिहासिक वारसा लाभलेल्या फैजपूर शहराच्या विकासासाठी शासनाकडून भरघोस निधी मिळवून देऊ असे आश्वासन रावेरचे आ.शिरीष चौधरी यांनी दिले. ते फैजपूर पालिके अंतर्गत तहानगर व विद्यानगर येथे रस्ता काँक्रीटीकरण कामांच्या भूमिपूजन प्रसंगी बोलत होते.
आज श्री छत्रपती शिवाजी महाराज जयंतीचे औचित्य साधून या दोन रस्त्यांचे भूमिपूजन आ.शिरीष चौधरी यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी ते म्हणाले फैजपूर शहराचे वेगळे स्थान आहे. याठिकाणी १९३६ मध्ये काँग्रेसचे पहिले ग्रामीण अधिवेशन भरले त्यामुळे भारताची स्वातंत्र्याची चळवळ फैजपूर येथे ग्रामीण भागात येऊन पोहचली. आणि हे अधिवेशन कायम स्मरणात राहावे व आपल्या गावाचा वारसा निर्माण व्हावा म्हणून पालिकेच्या सर्व पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी एकत्रित येऊन १९३६ च्या ग्रामीण अधिवेशनाच्या प्रतिकृती चे कोरीव संकल्प चित्र उभारले असे गौरव उदगार काढुन फैजपूर शहराने मला भरभरून आशिर्वाद दिले याचे ऋण व्यक्त केले.
रावेर विधानसभा मतदारसंघातील फैजपूर,यावल व रावेर तिन्ही नगरपालिकांना शासनाचा निधी मिळणे गरजेचे आहे.म्हणून या तिन्ही पालिकांच्या विकास कामांसाठी चांगल्या दर्जाचा निधी मिळविण्यासाठी आघाडी सरकार कडे सातत्याने पाठपुरावा सुरू असल्याचे सांगून. या तिन्ही नगरपालिकांना शासनाचा भरघोस निधी मिळवून देण्याचे आश्वासन रावेर चे आ.शिरीष चौधरी यांनी यावेळी दिले.यानंतर भाजपा गटनेता मिलिंद वाघूळदे यांनी फैजपूर शहराच्या हद्दवाढ भागांच्या विकास कामांसाठी भरगोस निधी मिळावा व फैजपूर शहरासाठी ग्रामीण रुग्णालयाला तत्वतः मंजुरी मिळाली आहे.अंतिम मंजुरीसाठी शासनाकडे प्रयत्न करण्याची आ.चौधरी यांच्या कडे मागणी वजा अपेक्षा व्यक्त केली.
भूमिपूजन कार्यक्रमाला नगराध्यक्षा महानंदा होले, उपनगराध्यक्ष सौ नयना चंद्रशेखर चौधरी,भाजपा गटनेता मिलिंद वाघूळदे, जिल्हा दूध संघ संचालक तथा जेष्ठ नगरसेवक हेमराज चौधरी, काँग्रेस गटनेता कलिम खां मण्यार, मुख्याधिकारी किशोर चव्हाण,
नगरसेवक केतन किरंगे,नगरसेवक रशीद तडवी, नगरसेवक देवेंद्र बेंडाळे, नगरसेवक प्रभाकर सपकाळे, नगरसेवक अमोल निंबाळे,माजी नगरसेवक महेबुब पिंजारी, सामाजिक कार्यकर्ते रविंद्र होले, शेख इरफान शेख इकबाल, मलक आबीद, ठेकेदार संजय वाणी, दीपक होले, हाडवैध रघुनाथ कुंभार,काँग्रेस शहर अध्यक्ष शेख रियाज,काँग्रेस शहर उपाध्यक्ष शेख आसिफ मॅकनिकल,युवक काँग्रेस रावेर विधानसभा क्षेत्र अध्यक्ष शेख वसीम जनाब, सरचिटणीस मुद्स्सर नजर, युवक काँग्रेस शहर अध्यक्ष वसीम तडवी, राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्याक जिल्हा उपाध्यक्ष शेख शाकिर,पालिका बांधकाम विभागाचे वरिष्ठ लिपिक दिलीप वाघमारे,लिपिक शिवा नेहेते, बाविस्कर आदी उपस्थित होते.