
मुंबई, वृत्तसंस्था | शिखर बँक घोटाळाप्रकरणी ईडीने माझ्यावर गुन्हा दाखल केला आहे. ईडीच्या चौकशीला पूर्ण सहकार्य करणार आहे. निवडणूक प्रचारासाठी मुंबईच्या बाहेर असेल, त्यामुळे मी स्वतः २७ सप्टेंबरला मुंबईतील ईडीच्या कार्यालयात हजर होईल. त्यांचा पाहुणचार स्वीकारण्याची माझी तयारी आहे, असे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज (दि.२५) येथे सांगितले.



