प्रेमातील अडथळा दूर करण्यासाठी पत्नीने पाजले पतीला विष

muder 3

 

पिंपरी चिंचवड (वृत्तसंस्था) आपल्या प्रेमातील अडथळा दूर करण्यासाठी पत्नीने चक्क प्रियकराच्या मदतीने पतीला विष पाजून ठार केल्याची घटना नुकतीच उघडकीस आलीय. दरम्यान, मयत इसम भारतीय लष्करात सेवेत होता.

 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संजय भोसले हे आसाम येथे भारतीय लष्करात कार्यरत होते. संजय यांच्या पत्नीचे घरासमोर राहणाऱ्या योगेश कदम (वय-२९) या तरुणासोबत गेल्या दोन वर्षापासून प्रेमसंबंध होते. संजयला काही दिवसापासून पत्नीचे प्रेम संबंधाची कुणकुण लागली होती. त्यावरून दोघांमध्ये अनेकदा भांडणही झाले होते. अखेर वैतागून संजय आणि शीतल दुसरीकडे भाड्याने राहण्यास गेला होता. परंतू संजय हे आसाम येथे कर्तव्यावर गेल्यानंतर शीतल आणि योगेश हे भेटतच होते. यादरम्यान, दोघांनी प्रेमात अडथळा ठरत असलेल्या संजयचा काटा काढायचे ठरवले. याच महिन्यात संजय हे सुट्टीवर राहत असलेल्या घरी परत आले. योगेश हा रासायनिक कंपनीत कामाला असल्याने त्याला विषारी औषधांची माहिती होती. त्याने प्रेयसी शीतलला सोडिअम साइनाइड आणून दिले. शीतल संजय यांना रात्री उशिरा पाण्यात विषारी रसायन देऊन त्यांचा खून राजगड पोलीस ठाण्याच्या हद्दीत फेकून दिला. दुसऱ्या दिवशी संजय यांचा मृतदेह हा राजगड पोलिसांना मिळाला. पत्नी शीतलला पोलिसांनी तीन दिवस सतत बोलावले, त्यानंतर मात्र उलट सुलट प्रश्न विचारल्याने त्यांनी स्वतः प्रियकर योगेश च्या मदतीने पतीचा खून केल्याची कबुली दिली.

Protected Content