ब्रेकींग न्यूज : पतीकडून पत्नी व चिमुकलीचा धारदार शस्त्राने केली हत्या; स्वत: केली आत्महत्या !

जामनेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जामनेर तालुक्यातील देऊळगाव गुजरी तालुका जामनेर येथे अतिशय हृदयकारक घटना घडली असून १२ एप्रिल रोजी दुपारी दीड वाजेच्या सुमारास घडली आहे. माहेरी गेलेल्या पत्नी व दीड वर्षाच्या मुलीचा धारदार शस्त्राने गळा चिरून निर्घृण खून केला तर स्वत: गावाकडे जावून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, विशाल मधुकर झनके रा. दुधलगाव ता. मलकापूर जिल्हा बुलढाणा या इसमाने देऊळगाव येथे माहेरी असलेल्या त्यांच्या पत्नी प्रतिभा विशाल झनके व एक वर्षाची मुलगी दिव्या विशाल झनके या दोघांचा धारदार शस्त्राने गळा चिरून खून केल्याची घटना घडली. त्यानंतर विशाल मधुकर धनके यांनी स्वतः त्यांच्या गावाकडे जाऊन आत्महत्या केली आहे. त्यांनी त्यांचे जीवन संपवले आहे. सदर ही घटना कौटुंबिक वादातून घडल्याची माहिती पोलिसांकडून समोर आली. सदर घटनेबाबत फत्तेपूर पोस्ट पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल झाला आहे. पुढील तपास मार्गदर्शनाखाली सपोनि गणेश फंड करीत आहे.

 

Protected Content