मुंबई, लाईव्ह ट्रेंड्स न्युज वृत्तसेवा – मुंबई सत्र न्यायालयाकडून राणा दाम्पत्यास जामिनाच्या अटी शर्तींचे उल्लंघन केल्या प्रकरणी नोटीस बजावण्यात आली आहे. त्यांच्याविरुद्ध अजामीनपात्र वॉरंट का जारी करू नये? याविषयी त्यांनी त्यांची भूमिका मांडण्याची नोटीस आहे.
मुंबई सत्र न्यायालयाने राणा दाम्पत्याला जामीन देताना अटी शर्ती घालून दिल्या होत्या. परंतु जामिना सुटका झाल्यानंतर राणा दाम्पत्यांकडून माध्यमांसमोर येत अनेक विधाने करण्यात आली. त्यामुळे रवी आणि नवनीत राणा यांनी त्यांच्या वक्तव्याने जामीन अटीचे उल्लंघन केले असल्याचे सांगत, जामीन आदेशानुसार त्यांचा जामीन रद्द व्हावा आणि या जोडप्याविरुद्ध अजामीनपात्र वॉरंट जारी करण्यात यावे. असा मुंबई पोलिसांनी न्यायालयात अर्ज दाखल केला असल्याचे सरकारी पक्षाचे म्हणणे आहे. त्यामुळे सरकारी वकिलांच्या अर्जाची सत्र न्यायालयाकडून दखल घेण्यात आली असून, तुमचा जामीन का रद्द करू नये अशा आशयाची नोटीस न्यायालयाने राणा दाम्पत्यास बजावली आहे.
या नोटीसीनुसार न्यायालयाकडून सुनावणी कधी घेण्यात येईल यासंदर्भात न्यायालयाने कोणताही खुलासा वा माहिती दिलेली नाही.
अजामीनपात्र वॉरंट का जारी करू नये- राणा दाम्पत्यास नोटीस
3 years ago
No Comments