मुंबई (वृत्तसंस्था) ‘आधी देश, मग पक्ष आणि मग आपण या तत्वानुसार आम्ही चालतो. पक्ष दणदणीत मताधित्याने निवडून येणार. राहिला माझ्या उमेदवारीचा विषय तर तिकीट का मिळालं नाही याबद्दल अमित भाई आणि पक्ष श्रेष्ठींशी भविष्यात नक्कीच चर्चा करेन,असे उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री विनोद तावडेंनी म्हटले आहे. ते एका खासगी वाहिनीशी बोलत होते.
भाजपाने विनोद तावडेंना तिकीट नाकारल्याच्या पार्श्वभूमीवर तावडेंनी आपले मत एका खासगी वाहिनीकडे व्यक्त केले आहे. ‘मी का नाही याबद्दल माझी किंवा पक्षाची काही चुक नाहीय. याबद्दल मी सन्माननिय अमित भाईंशी चर्चा करेने. पण सध्या निवडणुका असल्याने मी त्यावर काम करण्यास सुरुवात करणार आहे. पक्षाचे काम अधिक अधिक चांगल्या पद्धीतने करण्यावर माझा भर आहे. जे जे काम मला दिले जाईल ते मी करणार आहे,’ असे तावडेंनी यावेळी बोलताना स्पष्ट केले आहे. तावडे हे बोरिवली मतदारसंघामधून आग्रही होते. मात्र त्यांना चौथ्या यादीतही स्थान देण्यात आलेले नाही. भाजपने आज ७ उमेदवारांची यादी जाहीर केली. यामध्ये बोरिवलीतून विद्यमान खासदार असणाऱ्या विनोद तावडेंऐवजी सुनील राणे यांना तिकीट देण्यात आले आहे.