Home क्राईम मैत्रिणीकडे वाईट नजरेने का पाहताय? जाब विचारणाऱ्या तरुणाची हत्या

मैत्रिणीकडे वाईट नजरेने का पाहताय? जाब विचारणाऱ्या तरुणाची हत्या


पुणे (वृत्तसंस्था) मैत्रिणीकडे वाईट नजरेने काय पाहतोस, याचा जाब विचारला म्हणून एका तरुणाची डोक्यात दगड घालून हत्याची केल्याची खळबळजनक घटना पुण्यात घडली आहे. चंदन जयप्रकाश सिंह (वय 36 वर्ष) असे मयत तरुणाचे नाव आहे. दरम्यान, खून करणारे दोघं आरोपी फरार झाले आहेत.

खराडी चंदननगर लेबर कॅम्पजवळ चंदन सिंह आणि त्याची मैत्रीण बोलत उभे होते. त्यावेळी टिपू सुलतान फिरोज मनसुरी आणि अनिरुद्ध अमरीश राठोड हे दोघं जण त्याच्या मैत्रिणीकडे वाईट नजरेने पाहत होते. चंदनने याचा जाब विचारला. यावरून भडकलेल्या दोघांनी चंदनला लाथा बुक्क्यांनी बेदम मारहाण केली. त्यानंतर डोक्यात दगड घालून खून केला. या घटनेनंतर दोघं आरोपी फरार झाले असून चंदननगर पोलिस या प्रकरणाचा तपास करत आहे.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Protected Content

Play sound