Home राजकीय कोणाला मतदान केले लगेच समजेल, मतदान केंद्रांत मोदींनी कॅमेरे बसवलेत ; भाजप...

कोणाला मतदान केले लगेच समजेल, मतदान केंद्रांत मोदींनी कॅमेरे बसवलेत ; भाजप आमदाराची मतदारांना धमकी


modi
                                                               

दाहोद (वृत्तसंस्था) ‘मोदींनी मतदान केंद्रांमध्ये कॅमेरे बसवले आहेत. भाजप आणि काँग्रेसला कुणी मतदान केले? त्या सगळ्यांवर मोदी नजर ठेवून आहेत,’ असे म्हणत भाजप आमदार रमेश कटारा थेट मतदारांनाच धमकावत असल्याचा प्रकार समोर आला आहे. गुजरातच्या दाहोदमध्ये झालेल्या सभेत कटारा यांच्या भाषणाचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे.

 

तुम्ही मत कुणाला दिले? त्यावर मतदान केंद्रात मोदींनी बसवलेल्या कॅमेऱ्यांची नजर आहे, त्या सगळ्यांवर मोदी नजर ठेवून आहेत,’ असे कटारा म्हणाले. ईव्हीएमवर दाहोद मतदारसंघातील भाजप उमेदवार जसवंत भाभोर यांचा फोटो आहे. त्यासमोर कमळाचे चिन्ह आहे, ते पाहूनच बटन दाबा. कुठेही चूक होता कामा नये. कारण मोदींनी मतदान केंद्रांवर कॅमेरे बसवले आहेत. भाजपशिवाय अन्य कोणत्याही उमेदवाराला मतदान केले तर ते लगेच माहिती होईल. तुमच्या मतदान केंद्रातून भाजपला कुणी मत दिले नाही हे कळेल आणि त्यानंतर तुम्हाला काम मिळणार नाही, अशी धमकीही त्यांनी दिली. जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांनी कटारा यांना नोटीस बजावून त्यावर २४ तासांच्या आत उत्तर मागवले आहे. व्हिडिओमधील आवाज कटारा यांचाच असल्याचे प्रथमदर्शनी दिसून आले आहे, त्यामुळे आचारसंहितेचे उल्लंघन केल्याप्रकरणी त्यांना नोटीस बजावली आहे.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Protected Content

Play sound