फेसबुक आणि ट्वीटरने फेक अकाऊंटचे मालक कोण? हे जाहीर करावे – महेश तपासे

मुंबई प्रतिनिधी। फेसबुक आणि ट्वीटरने फेक अकाऊंटचे मालक कोण? ही फेक अकाऊंट कुठल्या आयपी अड्रेसवरून करण्यात आली याची माहिती द्यावी अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश प्रवक्ते महेश तपासे यांनी आज पत्रकार परिषदेत केली. 

महाविकास आघाडी सरकारला आणि मुंबई पोलिसांना बदनाम करण्याचा प्रयत्न भाजपाच्या आयटी सेलच्या माध्यमातून करण्यात आला असा आरोपही महेश तपासे यांनी केला आहे. सुशांतसिंग रजपूतच्या आत्महत्या प्रकरणात फेसबुक आणि ट्वीटरवर ८० हजार फेक अकाऊंट खोलण्यात आली. यातून सरकार आणि मुंबई पोलिसांची बदनामी आणि मंत्र्यांची बदनामी करुन बिहारच्या निवडणूकीत राजकीय फायदा होईल यासाठी ही अकाऊंट खोलण्यात आल्याचा पर्दाफाश मिशीगन युनिव्हर्सिटीच्या नामांकित लोकांनी तयार केलेल्या अहवालात केला आहे.

सुशांतसिंग रजपूत आत्महत्या प्रकरणात भाजपाने व त्यांच्या आयटी सेलने महाविकास आघाडी व मुंबई पोलिसांना बदनाम केल्याचे आणि त्याचा फायदा भाजपला झाल्याचे मिशीगन युनिव्हर्सिटीच्या अहवालात नमूद आहे असेही महेश तपासे यांनी सांगितले. दरम्यान एखाद्या खटल्याचा किंवा प्रकरणाचा न्यायालयीन तपास सुरू असताना कोणताही मिडिया  ट्रायल होवू नये असा भविष्यामध्ये केंद्राने कायदा करावा अशीही मागणी महेश तपासे यांनी यावेळी केली.

आम्हाला विविध सोशल मंचावर फॉलो करा

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.