विटनेरला महिलेस जीवे मारण्याची धमकी; अदखलपात्र गुन्हा दाखल

जळगाव प्रतिनिधी । तालुक्यातील विटनेर गावी स्वतःच्या शेतात काम करीत असताना महिलेसह तिच्या मुलास, कोर्टात दाखल केस मागे घे, अन्यथा जीवे ठार मारेल अशी धमकी दिल्याप्रकरणी एमआयडीसी पोलीस स्टेशनला गुन्हा अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शिलाबाई विजयसिंग परदेशी (वय ४०, रा. कुसूंबा, मूळ गाव विटनेर) यांनी एमआयडीसी पोलीस स्टेशनला फिर्याद दिली आहे. त्यानुसार अदखलपात्र गुन्हा दाखल झाला आहे. शिलाबाई परदेशी ह्या रविवारी दि. १६ जानेवारी रोजी संध्याकाळी ६. ३० वाजता स्वतःच्या शेतात विटनेर येथे काम करीत होत्या. त्यावेळी त्यांचा मोठा मुलगा सागर परदेशी देखील शेतात काम करीत होते. त्यावेळी संशयित आरोपी संजय भावसिंग परदेशी, राजेंद्र भावसिंग परदेशी, पवन राजू परदेशी, रवींद्र राजू परदेशी हे शेतात गैरइराद्यानें आले. त्यांनी मागील भांडणाचा विषय काढून शिवीगाळ केली. तसेच कोर्ट दाखल केस मागे घे, नाहीतर जीवे ठार मारेन अशी धमकी दिली.

याप्रकरणी घाबरलेल्या फिर्यादी शिलाबाई परदेशी यांनी एमआयडीसी पोलीस स्टेशनला सोमवार दि. १७ जानेवारी रोजी तक्रार दिली आहे. त्यानुसार पोलीस स्टेशनला अदखलपात्र गुन्हा दाखल असून पुढील तपास पोहेकॉ गफ्फार तडवी करीत आहे. दरम्यान, संशयित आरोपींचा गावात अनेक जणांना त्रास असून त्यांच्यावर पोलिसांनी कारवाई करावी अशी मागणी फिर्यादींनी केली आहे.

 

 

Protected Content