जळगाव प्रतिनिधी । जळगाव पिपल्स बँक रामदास पाटील स्मृती सेवा ट्रस्ट संचालित शहरातील पब्लिक स्कूलमध्ये विद्यार्थ्यांच्या कलागुणांना तसेच त्यांच्या भौतिक व शैक्षणिक विकास व्हावा, या हेतूने विविध उपक्रम राबवण्यात येत असतात. त्याचाच एक भाग म्हणून शाळेत आज (दि.३) “व्हाइट कलर डे” सेलिब्रेशन करण्यात आले आहे.
यावेळी स्कुलमधील सर्व विद्यार्थ्यांनी व्हाइट कलर मध्ये ड्रेस परिधान केले होते. तसेच विद्यार्थ्यांनी पांढरा रंगात विविध वस्तू तयार केल्या होत्या. शाळेत प्रत्येक महिन्याला विविध रंग (कलर डे) साजरा केला जात असून त्यावर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले जाते.