व्हाट्सॲपचे ‘रिमाइंड फिचर’ सुविधा लवकरच !

WhatsApp Remind

 

नवी दिल्ली वृत्तसंस्था । आजच्या धावपळीच्या युगात आपण बर्‍याच गोष्टी विसरतो किंवा चुकवतो. यासाठी बरेच लोक आपल्या फोनमध्ये “स्मरणपत्रे”(Reminder) लावतात. पण आता रिमाइंड लावण्याची गरज नसून व्हॉट्सॲप तुम्हाला सर्व रिमाइंड करणार आहे. यामुळे तुम्ही कोणतीही गोष्ट विसणार नाही. व्हाट्सॲप लवकरच तुमच्यासाठी ही सुविधा घेवून येत आहे.

Any.do या अ‍ॅपद्वारे टास्क आणि रिमाइंडर सेट करता येते, त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला वेळेवर येतात. टेक वेबसाइट Android Police द्वारे Any.do अ‍ॅपने व्हॉट्सअ‍ॅपसोबतच्या भागीदारीची घोषणा केली. या फीचरद्वारे युजर्ससाठी कोणतीही टास्क किंवा रिमाइंडर (कॉल किंवा शॉपिंगबाबतच्या बाबी सेट करता येतील) सेट करता येईल. इतकंच नाही तर तुम्ही सेट केलेल रिमाइंडर कोणत्याही व्हॉट्सअ‍ॅप कॉन्टॅक्टला फॉरवर्ड देखील करता येणार आहे. मोबाईलमध्ये काहीही ‘टास्क क्रिएट’ केल्यास तुम्हाला रिमाइंडर हवंय की नाही, याबाबत विचारणा केली जाईल. त्यानंतर ठरवलेल्या वेळेवर तुम्हाला WhatsApp द्वारे रिमाइंडर मिळेल.

Protected Content