दिल्ली-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | व्हॉट्सॲपने ३० दिवसांत ७१ लाखांहून अधिक भारतीय खात्यांवर बंदी घातली आहे. खुद्द कंपनीनेच या बाबत माहिती दिली आहे. खरे तर, मेटा च्या इन्स्टंट मेसेजिंग प्लॅटफॉर्म व्हाट्सएपने एप्रिल २०२४ मध्ये ही कारवाई करत प्लॅटफॉर्मवरील ७१ लाखांहून अधिक भारतीय खात्यांवर बंदी घातली होती. भारतीय कायद्यांचे उल्लंघन करणरी ही खाती असल्याची माहिती कंपनीने दिली आहे. व्हॉट्सॲप मेसेजिंग प्लॅटफॉर्म आयटी नियम, २०२१ अंतर्गत मासिक अहवाल प्रकाशित करते. या अहवालात, व्हॉट्सॲप वापरकर्त्यांकडून आलेल्या तक्रारींवर केलेल्या कारवाईची आणि ती शोधणे तसेच प्रतिबंध करण्याबाबतची माहिती कंपनीमार्फत शेअर करण्यात येते. यात ही धक्कादायक माहिती उघड झाली आहे. १ एप्रिल ते ३० एप्रिल या कालावधीत करण्यात आलेल्या कारवाईबाबतच्या अहवालानुसार वापरकर्ते त्यांच्या तक्रारी ई-मेल किंवा पोस्टद्वारे भारतीय तक्रार अधिकाऱ्यांकडे पाठवू शकतात. एप्रिलमध्ये, कंपनीला बंदी अपील, सुरक्षा, खाते समर्थन आणि इतर गोष्टींबाबत १०,५५४ तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. नागरिकांच्या तक्रारींना प्रतिसाद देण्याव्यतिरिक्त, कंपनी प्लॅटफॉर्मवर “हानीकारक माजकूनर टाळण्यासाठी विविध साधने आणि तंत्रज्ञानाचा वापर केला जातो.
अनेक यूझर्स हे व्हॉट्सॲपचा गैर वापर करत असतात. त्यामुळे नव्या आयटी कायद्या अंतर्गत अशी खाती शोधून ती रद्द करण्यासाठी कंपनीने पावले उचलली आहे. व्हॉट्सॲपचा गैरवापर करणारी खाते शोधण्यासाठी तीन टप्प्यांवर कार्य केले जाते. ॲप नोंदणी करताना, मेसेजिंग दरम्यान आणि नकारात्मक फीडबॅकच्या प्रतिसाद देतांना वापरकर्ता अहवाल आणि ब्लॉक्सच्या स्वरूपात माहिती प्राप्त होते अशी माहिती व्हॉट्सॲपने दिली आहे. व्हॉट्सॲप विश्लेषकांची टीम ही ऊं प्रणालीचा वापर करून बनावट खाती शोधून डिलीत करते.प्रतिबंधित खात्यांच्या संख्येमध्ये या यंत्रणेद्वारे मिळालेल्या रिपोर्टमध्ये विविध वैशिष्ट्याद्वारे वापरकर्त्यांकडून मिळालेल्या नकारात्मक अभिप्रायानंतर केलेल्या कारवाईचाही समावेश आहे,” असे कंपनीने म्हटले आहे. भारतात एकूण ७१,८२,००० भारतीय खात्यांवर बंदी घालण्यात आली होती. यापैकी १३,०२,००० खाती वापरकर्त्यांचा कोणताही अहवाल येण्यापूर्वीच बॅन करण्यात आली होती. भारतीय खाते ‘+९१’ फोन क्रमांकाद्वारे ओळखले जातात.