तक्रार निवारणीत पश्चिम रेल्वेची आघाडी

मुंबई-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | रेल्वे प्रवासादरम्यान प्रवाशांना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. तिकिट तपासणी, खानपान सेवा, स्वच्छता आणि इतर सेवा यासंबंधी प्रवासी “रेल मदत” अ‍ॅपद्वारे तक्रारी करतात. याच तक्रारींच्या तत्काळ निवारणात पश्चिम रेल्वेने देशात पहिला क्रमांक पटकावला आहे.

2023-24 या आर्थिक वर्षात पश्चिम रेल्वेचा तक्रार निवारण कार्यक्षमता निर्देशांक (GREI) स्कोअर ०.९६ इतका असून, सर्व विभागीय रेल्वेंमध्ये ती अव्वल ठरली आहे. एप्रिल 2023 मध्ये तक्रार निवारणाचे प्रमाण 8.29% होते, जे फेब्रुवारी 2024 मध्ये 4.97% पर्यंत घटले आहे – म्हणजेच सुमारे 40 टक्क्यांची लक्षणीय सुधारणा नोंदवण्यात आली आहे.

2023 मध्ये: ११७० दशलक्ष प्रवाशांची सेवा + ४७,१२० तक्रारी नोंद.
2024 मध्ये: १२४७ दशलक्ष प्रवासी + ४१६८० तक्रारींचे निराकरण.

पश्चिम रेल्वेने आपल्या सर्व सहा विभागांमध्ये ‘वॉर रूम’ कार्यान्वित केल्या आहेत. यामध्ये रिअलटाईम पद्धतीने तक्रारींवर लक्ष ठेवून त्यांचे निराकरण केले जाते. प्रवाशांना सुविधा देण्याच्या या सातत्यपूर्ण प्रयत्नांमुळेच आज पश्चिम रेल्वेला हे यश मिळाले आहे. रेल्वे प्रशासनाच्या म्हणण्यानुसार, ‘रेल मदत’ अ‍ॅपवरील प्रत्येक तक्रारीला सर्वोच्च प्राधान्य दिले जाते. प्रवाशांच्या समाधानासाठीची ही वचनबद्धता हीच पश्चिम रेल्वेच्या यशामागील खरी ताकद आहे.

Protected Content