यावल ( प्रतिनिधी)। यावल पोलीस ठाण्याचे पो.नि. अरूण धनवडे हे कोरोनामुक्त झाल्याने यावल तालुका पोलीस पाटील संघटनेच्या वतीने त्यांचे स्वागत करण्यात आले.
यावलचे पोलीस निरिक्षक अरूण धनवडे यांनी कोरोना संकटामुळे ओढवलेल्या लॉकडाऊनच्या चार महिन्याच्या कालावधीत तालुक्यातीत सर्वसामान्य नागरीकांना संसर्गापासुन बचाव करण्यासाठी शासन नियमांची शिस्तीची अमलबजावणी आणी काटेकोर पालन करण्याकरिता वेळोवेळी गावपातळीवर कोरोना संसर्गाच्या पार्श्वभुमीवर तालुक्यातील पोलीस पाटीलांशी संपर्क साधुन त्यांना मार्गदर्शन केले.
कोरोना या विषाणुच्या महामारी संकटासमयी प्रत्येक पोलीस पाटीलामध्ये लढण्याची व गावातील ग्रामस्थांमध्ये आत्मविश्वास आणी जिद्द निर्माण करण्यात त्यांचे अतिशय मोलाचे सहकार्य लाभले. दरम्या गेल्या काही दिवसांपासून ते कोरोना बाधित होते.
दोन दिवसांपुर्वी ते कोरोनामुक्त झाले असून यावल तालुका पोलीस पाटील संघटनेचे तालुकाध्यक्ष पवन चौधरी, पो.पा. दिपक पाटील आणि सामाजिक कार्यकर्ते संजय कोळी आदींनी त्यांची भेट घेवुन स्वागत केले.