जळगाव प्रतिनिधी । वाघ नगरातील विवेकानंद प्रतिष्ठान प्राथमिक शाळेत आज सोमवारी 4 ऑक्टोबर इयत्ता 5 वी ते 8 वी च्या विद्यार्थ्यांचे ढोल-ताशांच्या गजरात, जल्लोषात स्वागत करण्यात आले.
याप्रसंगी शाळेचे मुख्याध्यापक हेमराज पाटील, समन्वयिका वैशाली पाटील, हर्षदा कुलकर्णी यांनी विद्यार्थ्यांचे औक्षण करून तसेच गुलाब पुष्प देऊन स्वागत केले. विद्यार्थ्यांच्या आयुष्यात शाळेचे महत्त्वाचे स्थान असते. शाळेच्या गेटजवळ विद्यार्थ्यांना सुरुवातीला सॅनिटायझर करण्यात आले.त्यांचे थर्मल गन च्या साह्याने तापमानाची नोंद करण्यात आली. तसेच सर्व विद्यार्थ्यांनी मास्क लावलेले आहे की नाही याची सुद्धा तपासणी शिक्षकांनी केली.
शाळेचा पहिला दिवस असल्याने विद्यार्थ्यांच्या व पालकांच्या प्रचंड आनंद दिसून येत होता. विद्यार्थी खूप उत्साहात होते या उत्साहपूर्ण वातावरणात विद्यार्थ्यांच्या अंगावर पुष्पवृष्टी करण्यात आली या प्रसंगी मुलांना मनस्वी आनंद झालेला पाहून शिक्षकांनाही ही मुलं शाळेत आल्याचा आनंद झाला माननीय मुख्याध्यापक हेमराज पाटील यांनी मुलांना पुष्पगुच्छ देऊन त्यांचे स्वागत केले आणि विद्यार्थ्यांचा आनंद द्विगुणित केला राजश्री पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांनी ढोल पथकाच्या जल्लोषात विद्यार्थ्यांचे हार्दिक स्वागत केले तसेच शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी मुलांना शाळेत प्रसन्न वाटावे यासाठी फुगे, फुले याद्वारे आकर्षक सजावट केलेली होती. कार्यक्रम यशस्वीतेसाठी समन्वयिका वैशाली पाटील, सचिन गायकवाड यांच्यासह शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.