Home धर्म-समाज भुसावळ येथून शेगावला निघालेल्या पायी दिंडीचे मुक्ताईनगरात स्वागत

भुसावळ येथून शेगावला निघालेल्या पायी दिंडीचे मुक्ताईनगरात स्वागत

0
47

मुक्ताईनगर प्रतिनिधी | भुसावळ येथून साई मित्र परिवाराच्यावतीने आयोजित करण्यात आलेल्या श्री शेगाव संत गजानन महाराज संस्थानकडे निघालेल्या पायी दिंडीचे मुक्ताईनगर येथील जागृत हनुमान मंदिरात स्वागत करण्यात आले.

मुक्ताईनगर येथील जागृत हनुमान मंदिर येथे ‘विघ्नहर्ता उद्योग समूह’ या परिवाराचे संस्थापक दिनेश बाविस्कर यांच्या वतीने पुष्पहार व गुलाब पुष्प देऊन करण्यात आले.

यावेळी भक्तांना तीर्थप्रसाद म्हणून चहा व बिस्कीट वाटप करण्यात आले. भक्तांनी मंडळाचे आभार मानले. फराळ वाटप करण्यासाठी गोपाळ गावंडे, श्री.अतुल, ज्ञानेश्वर लोखंडे, कुंदन कोळी, कार्तिक बाविस्कर यांनी सहकार्य केलं.


Protected Content

Play sound