जळगाव, प्रतिनिधी | श्री गणेशाचे जळगाव शहरासह जिल्ह्यात आज सोमवारी मोठ्या उत्साहात आगमन झाले. महिला-युवती, बालकांसह वृद्धांनी वाजतगाजत मिरवणूक काढत गणेशाचे स्वागत केले. यासंदर्भात ‘लाईव्ह ट्रेंड्स न्यूज’च्या प्रतिनिधीने भाविकांसोबत सवांद साधला असता त्यांनी गणपती बाप्पाचे आगमन घराला चैतन्य देणारे असल्याचे मत व्यक्त केले.
शहरातील ठिकठिकाणच्या चौकात लहान-मोठ्या आकाराच्या गणपती मूर्ती खरेदीसाठी नागरिकांनी सकाळपासून कुटुंबांसह बाजारपेठेत हजेरी लावली. सार्वजनिक गणेश मंडळाच्या गणेशमूर्ती ढोलताशाच्या गजरात मिरवणूक काढून आपआपल्या मंडळाकडे जाताना दिसत होते. भाविक शाडू मातीपासून बनविलेल्या गणेश मूर्ती खरीदी करून पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करण्यावर भर देतांना दिसले.