पाचोरा-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | यावल येथील आदिवासी प्रकल्प कार्यालयाच्या प्रमुखपदी नुकतेच रूजू झालेले अरूण पवार यांचे स्वाभीमानी शिक्षक-शिक्षकेतर संघटनेच्या वतीने स्वागत करण्यात आले.
आदिवासी विभागाअंतर्गत चालवण्यात येणार्या जिल्ह्यात एकूण ४९ शाळा असून सदर आश्रमशाळा यांचे प्रकल्प कार्यालय यावल येथे आहे. या प्रकल्पाच्या प्रकल्पाधिकारी विनिता सोनवणे यांची उपायुक्तपदी पदोन्नती झाल्याने त्यांच्या जागी प्रकल्प अधिकारी म्हणून अरुण पवार यांची नियुक्ती करण्यात आली असून त्यांनी अलीकडेच पदभार सांभाळला आहे.
दरम्यान, स्वाभिमानी शिक्षक शिक्षकेतर संघटनेचे राज्य अध्यक्ष भरत पटेल यांच्या मार्गदर्शनाखाली नवनिर्वाचित प्रकल्प अधिकार्याचे स्वागत स्वाभिमानी शिक्षक शिक्षकेतर संघटनेचे राज्य उपाध्यक्ष विजय कचवे, राज्य सहकार्यवाह भूपेंद्र पाटील, राज्य सदस्य किरण पाटील, जिल्हा कार्यवाह संजय अलोने, जिल्हा सदस्य पी. डी. पाटील, रवींद्र पाटील, पंकज पाटील यांनी केले.
यावेळी प्रकल्प अधिकारी अरुण पवार यांनी सांगितले की, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचार्यांच्या समस्या सोडवू असे आश्वासन प्रकल्प अधिकारी यांनी दिल्याचे जिल्हा प्रसिद्ध प्रमुख उत्तमराव मनगटे (पाटील) यांनी कळविले आहे.