यावल प्रतिनिधी । जिल्ह्यात वाढत जाणारा कोरोना संसर्ग लक्षात घेऊन जिल्हाधिकाऱ्यांनी लग्न समारंभासाठी व्यक्तींची मर्यादा घातली आहे. सदरील आदेश मोडून लग्न समारंभ करणाऱ्या यावल तालुक्यातील मालोद येथील वधु पित्यास ११ हजारांचा तर शहरातील मिठाई दुकानदारास २,५०० रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे.
तालुक्यातील मालोद गावात एका लग्नाच्या कार्यक्रमात सुमारे शंभर ते दिडशे वऱ्हाडी मंडळी वधुच्या पिताने जमवुन कोवीड१९ या संचारबंदीच्या नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी पोलीसांनी अकरा हजार रुपयांचे दंड ठोठावला आहे. या संदर्भात मिळालेली माहीती अशी मालोद तालुका यावल येथे आज (दि१६ मे) रोजी दुपारी १ ते १:३० वाजेच्या सुमारास येथील राहणारे अहमद हिम्मत तडवी यांच्या मुलीचे आज लग्न आयोजीत करण्यात आले होते. या करीता कोवीड१९च्या संचारबंदी नियमानुसार विवाह न लावता त्या ठीकाणी नियमांचे उल्लंघन करीत सुमारे शंभर ते दिड शे वऱ्हाडी मंडळी जमवुन जिल्हाधिकारी यांच्या आदेशाकडे दुर्लक्ष केल्याप्रकरणी यावल पोलीसांनी अकरा हजार रुपयांचे दंड ठोठावला आला आहे. यावेळी मिळालेल्या माहितीचा आधार घेत यावलच्या पोलीस पथकाने ही कारवाई केली आहे.
या कार्यवाहीत पोलीस अमलदार निलेश वाघ, सलीम शेख व पोलीस अमलदार ज्ञानेश्वर कोळी यांनी सहभाग घेतला . दरम्यान यावल शहरातील दुसऱ्या एका. कारवाईत पोलीसांनी भुसावळ पाँईंट परिसरातील शेतकी संघाच्या व्यापारी संकुलनातील श्री क्षेमकरी या राजस्थानी मिठाईच्या दुकानावर कोवीड१९च्या नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी २५०० रुपयांचा दंड ठोठावला आहे. या कारवाईत पोलीस निरिक्षक सुधीर पाटील व त्यांच्या पोलीस कर्मचाऱ्यांच्या पथकाने भाग घेतला.