आत्महत्याग्रस्त शेतकर्‍यांच्या उपवर मुला-मुलींच्या विवाहासाठी संकेतस्थळ

download 1 2

जळगाव, प्रतिनिधी | आत्महत्याग्रस्त शेतकर्‍यांच्या आत्महत्येचे विश्‍लेषण हॅप्पी मिरर रिसर्च ऍण्ड मल्टीपर्पज फाउंडेशनचे प्रा.डॉ. आशिष जाधव यांनी केले असून त्यावर उपाय योजनांचा शोध घेतला जाणार आहे. आत्महत्याग्रस्त शेतकर्‍यांच्या मुला- मुलींच्या विवाहासाठी संकेतस्थळ सुरु करण्यात येणार आहे. या संकेतस्थळावर मुलींची नोंदणी मोफत असल्याची माहिती पत्रपरिषदेत देण्यात आली.

 

याप्रसंगी  प्रा. डॉ.आशिष जाधव, डी.डी.बच्छाव, गनी मेनन, ईश्‍वर मोरे, शिवराम पाटील, अशफाक पिंजारी, डॉ. शरीफ आदी उपस्थित होते.  यावेळी २०१२ ते २०१८ मध्ये झालेल्या शेतकरी आत्महत्यांचे संख्या शास्त्रीय विश्‍लेषण मांडण्यात आले. २०१५ मध्ये सर्वाधिक २०० शेतकरी आत्महत्त्या झालेल्या आहेत. वर्षाच्या जुन ते डिसेंबर या महिन्यांमध्ये सर्वाधिक शेतकर्‍यांच्या आत्महत्त्या होतात. ती टक्केवारी ६० ते ६५ टक्के आहे. सर्वात गांभिर्याची बाब म्हणजे आत्महत्त्या करणार्‍यांमध्ये १५ ते ३३ वर्षे वयोगटातील तरुण व्यक्तींचे प्रमाण वाढले असून ते ६५ टक्के आहे. शेतकरी आत्महत्त्याग्रस्त व्यक्तींसाठी, कुटूंबियांसाठी संस्था उपक्रम राबविणार असून पारोळा, अमळनेर, चाळीसगाव , जामनेर आणि पाचोरा या तालुक्यात आत्महत्त्याग्रस्त शेतकरी शोध, बोध आणि उपाय या विषयाला धरुन १ दिवसीय कार्यशाळा घेण्यात येणार आहे.

एकदिवसीय लक्षणीस आंदोलन
आत्महत्याग्रस्त प्रकरणांकडे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी हॅप्पी मिरर रिसर्च मल्टीपर्पज फाउंडेशन, जवान फाउंडेशन,जळगाव जागृतमंच तर्फे १५ ऑगस्ट रोजी लाक्षणिक उपोषण केले जाणार आहे अशी माहिती यावेळी देण्यात आली.

Protected Content