पाचोरा पोलीस प्रशासनातर्फे वेब मीडिया असोसिएशन पदाधिकाऱ्यांचा सत्कार

पाचोरा प्रतिनिधी । महाराष्ट्र राज्य अधिकृत सरकारी मान्यताप्राप्त वेब मीडिया असोसिएशन मुंबईचे संस्थापक अध्यक्ष अनिल महाजन यांच्या आदेशानुसार, उत्तर महाराष्ट्र विभागीय अध्यक्ष अजय जयस्वाल यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाध्यक्ष ईश्वर चोरडिया यांनी जाहीर केलेल्या पाचोरा तालुका वेब मीडिया असोसिएशन पदाधिकारी आणि सदस्यांचा सत्कार करण्यात आला. 

सत्कार समारंभ पाचोरा पोलीस कार्यालयात घेण्यात आला असून पाचोरा पोलीस प्रशासनातर्फे पोलिस उपअधीक्षक भारत काकडे व पोलिस निरीक्षक किसनराव नजनपाटील यांच्या हस्ते संपन्न झाला. पोलिस उपअधीक्षक भारत काकडे यांनी वेब मिडीया असोसिएशन कार्यपद्धती व कार्यप्रणालीचे आणि नवनियुक्त पदाधिकारी व सदस्य यांचे टिमवर्क’चे तोंडभरून कौतुक केले आणि भावी यशस्वी वाटचालीसाठी मनपुर्वक शुभेच्छा दिल्यात आणि वेब मिडिया असोसिएशन च्या सर्व पत्रकारांसाठी लागणारी सर्वोत्परी मदत करण्याचे वचन यावेळी सर्वांसमक्ष दिलेत. एवढेच नाही तर कोरोना काळात शासनाची व प्रशासनाची नियमावली,अटी शर्ती निर्बंध बाबत जनजागृती माहिती वेळोवेळी सर्वसामान्य लोकांपर्यंत पोहचवुन कोरोना व्हायरस’चे रूग्ण आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न केला त्याबद्दल खरचं मनापासुन आभार व्यक्त करणे हे आमचे दायित्व आहे. म्हणुन सर्व वेब पत्रकारांचा सत्कार करायचा योग आला.

पत्रकार हे लोकशाहीचा चौथा स्तंभ असुन – समाजासाठी पारदर्शक आरसा आहेत. काही चुका झाल्या तर नक्कीच लक्षात आणुन देण्याचे काम पत्रकार नेहमी करून देत असतात – पत्रकारिता हि सेवा असुन नक्कीच ते नेहमी सर्वांना मोठं करत असतात आज त्यांचा सत्कार करण आमचे कर्तव्य आहे.पोलीस प्रशासनाला नेहमी सहकार्य केल्याबद्दल  पोलिस निरीक्षक किसनराव नजनपाटील यांनी आभार व्यक्त केले. तर वेब मिडिया असोसिएशन मुंबई चे विभागीय अध्यक्ष अजय जैस्वाल यांनी पत्रकारांवर होणारे अन्यायाविरुद्ध सत्य चौकशी करून तातडीने न्याय देण्याची भुमिका ठेवावी हि अपेक्षा व्यक्त केली. यावेळी विभागीय अध्यक्ष – अजय जैस्वाल (गर्जा महाराष्ट्र न्युज समुह जळगाव), जिल्हा अध्यक्ष – ईश्वर चोरडिया (जे.बी.एन. महाराष्ट्र सहसंपादक), जिल्हा उपाध्यक्ष – सचिन पाटील (फोकस न्युज संपादक), जिल्हा संघटक- एन. एस. भुरे (आरोग्य दुत न्युज संपादक), जिल्हा समन्वयक – जावेद शेख (स्टार १८ न्युज), जिल्हा खजिनदार- भुवनेश दुसाने (फोकस न्युज कार्यकारी संपादक), जेष्ठ सदस्य – योगेश पाटील (झेप इंडिया’चे संपादक), जेष्ठ सदस्य – रविशंकर पांडे (देशदुत, आरोग्य दुत), जेष्ठ सदस्य – राजेश धनराळे (आर. के. न्युज), तालुका अध्यक्ष- निलेश पाटील  (एम. एन. न्युज) तालुका उपाध्यक्ष – बंडु सोनार (तालुका माझा), तालुका उपाध्यक्ष- दिपक गढरी (सी.एन. आय. महाराष्ट्र प्रतिनिधी), तालुका सचिव- संजय पाटील (झेप इंडिया’चे प्रतिनिधी), तालुका सरचिटणीस- दिलीप परदेशी (झुम मराठी न्युज संपादक), तालुका समन्वयक- प्रमोद बारी (जनलक्ष न्युज संपादक), रेल्वेमित्र दिलीप पाटील (ट्रेन लाइव्ह न्युज संपादक), सदस्य – फकिरचंद पाटील (इंडिया आपतक न्युज), सदस्य – राहुल महाजन (गर्जा महाराष्ट्र सहसंपादक), सदस्य – भिकन पाटील (स्टार १८ न्युज), सदस्य – सचिन चौधरी ( फोकस न्युज संपादक), जिल्हा सचिव- दिनेश चौधरी, जिल्हा खजिनदार – दिपक पवार, (तिसरा डोळा न्युज २४ संपादक), आतिक चांगरे व संदिप तांबे, दिलीप पाटील, स्वप्निल कुमावत, विजय पाटील, किरण मोरे, यशवंत पवार, ज्ञानेश्वर राजपुत, सोनु परदेशी, सुनिल सोनार, राजु निकम (संपादक आर.डी. आर. न्युज), दिपक मुलमुले, राजु ठाकुर, दिलीप चौधरी यांना पाचोरा पोलीस प्रशासनातर्फे सन्मानित करण्यात आले.

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

Protected Content