हवामानावर आधारीत फळपीक विमा योजनेस मुदतवाढ मिळावी – जावळे

haribhau javale

फैजपूर, प्रतिनिधी | हवामानावर आधारीत फळपीक विमा योजनेस मुदतवाढ मिळावी आणि केळी पिकांवरील करपा रोगासाठी शेतकऱ्यांना औषधांचा पुरवठा करण्यात यावा, अशी मागणी कृषी शिक्षण व संशोधन परिषद उपाध्यक्ष ना.हरीभाऊ जावळे यांनी आज कृषी आयुक्त कार्यालय पुणे येथे मुख्य सांख्यिकी उदय देशमुख, श्रीमती देवरे यांच्याकडे केली आहे.

 

प्रधानमंत्री फसल बिमा योजनेअंतर्गत हवामानावर आधारित फळपीक विमा योजना सन २०१९-२० दिनांक ३१ ऑक्टोबर २०१९ च्या शासन निर्णयानुसार सुरु झाली आहे. परंतु प्रीमियम भरण्याचा कालावधी फक्त सात दिवस असल्याने आणि सर्व्हरमध्ये तांत्रीक अडचण निर्माण झाल्यामुळे बरेचसे केळी उत्पादक शेतकरी प्रिमियम भरण्यापासून वंचित राहिले आहेत. शेतकऱ्यांच्या आलेल्या मागणीवरुन केळी उत्पादक शेतकऱ्यांना प्रिमियम भरण्यासाठी ७ ते ८ दिवस मुदत वाढवून देण्यात यावी.

तसेच निसर्गाच्या असमतोलामुळे जळगाव जिल्यातील केळी पिकावर करपा रोगाचा मोठ्याप्रमाणात प्रादुर्भाव दिसुन येत आहे. सन २०११ मधे केंद्र सरकार मार्फत करपा निर्मूलनासाठी ९५ कोटी रुपयांचे पॅकेज मंजूर करण्यात आले होते. त्यापैकी अंदाजीत ६५ कोटी रुपयांचा निधी अद्यापही राज्य सरकारकडे पदुन आहे. तरी त्या निधीअंतर्गत केळी पिकांवरील करपा निर्मूलनासाठी शेतकऱ्यांना विविध औषधांचा पुरवठा करण्यात यावा, अशा प्रकारच्या मागण्या ना.जावळे यांनी यावेळी मांडल्या.

Protected Content