नवी दिल्ली (वृत्तसंस्था) आमच्याकडे (शिवसेना सोडून भाजप आणि मित्रपक्षांकडे) सध्या 120 आमदारांचे संख्याबळ आहे. शिवसेना आमच्या सोबत आली नाही तर आम्ही 120 आमदारांच्या संख्याबळावर अल्पमतातलं सरकार स्थापन करु. त्यासाठी 25 आमदारांचा पाठिंबादेखील मिळवू. हे अल्पमतातले सरकार आम्ही पाच वर्ष चालवून दाखवू. अशा शब्दात आठवले यांनी शिवसेनेला इशारा दिला आहे, ते एका वृत्तवाहिनीशी बोलत होते.
रामदास आठवले म्हणाले की, राज्यातल्या जनतेने महायुतीच्या बाजूने कौल दिला आहे. महायुतीसाठी मतदान केले आहे. त्यामुळे शरद पवार आणि सोनिया गांधी यांनी राज्यातील जनतेच्या मताचा आदर करावा. त्यांनी सत्तास्थापनेसाठी शिवसेनेला पाठिंबा देऊ नये. शिवसेनेने त्यांची आडमुठेपणाची भूमिका सोडत मुख्यमंत्रीपदाची मागणी करणं थांबवावे. शिवसेनेने मुख्यमंत्रीपदाचा हट्ट सोडून द्यावा आणि उपमुख्यमंत्रीपद पदरात पाडून घ्यावे. लोकसभा निवडणुकीपूर्वी सत्तास्थापनेबाबत 50-50 चा फॉर्म्युला ठरवण्यात आला होता. परंतु 50-50 चा फॉर्म्युला म्हणजेच एका पक्षाला मुख्यमंत्रीपद आणि दुसऱ्याला उपमुख्यमंत्रीपद असा होता.