कळमसरे येथे पंचवीस दिवसाआड पाणी पुरवठा ; पाण्यासाठी नागरिकांची भटकंती

amalner 8

 

अमळनेर (ईश्वर महाजन) तालुक्यातील कळमसरे येथे पंचवीस दिवसाआड पाणी पुरवठा होत असल्यामुळे भीषण पाणी टंचाईला सामोरे जावे लागत आहे. इतके दिवस पाणी साठवून ठेवणे शक्य नसल्याने परिस्थिती गंभीर झाली आहे. दरम्यान, गावातील जीवंत कुपनलिका दुरुस्त होण नसल्यामुळे पाणी टंचाई वाढल्यामुळे नागरिकांमधून संताप व्यक्त होत आहे.

 

 

कळमसरे गावात पाच ठिकाणी कुपनलिका असून त्यापैकी तीन कुपनलिकाना बऱ्यापैकी पाणी असल्याने त्यावर गावातील गुरे, ढोरे व वापरण्यासाठी त्याचा उपयोग होऊ शकतो. मात्र मागील वर्षभरापासुन या कुपनलिकाना नादुरुस्तीचे ग्रहण लागले आहे. पंचायत समितीकडे याबाबत ग्रामपंचायतीने वेळोवेळी तक्रार देउनही दुर्लक्ष होत असल्याचा आरोप ग्रामस्थानी केला आहे. कळमसरे गावाला यावर्षी पावसाला अत्यल्प झाल्याने सुरूवातीपासुन पाणी टंचाईला सामोरे जावे लागत आहे. मात्र सद्य स्थितीत कडक उन्हाळा असल्याने पाणी पातळी खोल गेली आहे.त्यामुळे सुमारे पंचवीस दिवसाच्या अंतराने गावात पाणी पुरवठा केला जात आहे. यातच एवढे दिवस पाणी साठवून ठेवने शक्य नसल्याने ग्रामस्थांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे.

 

गावात सद्यस्थतीत बोहरा येथून मागील पंचवार्षिक काळात भारत निर्माण योजनेअंतर्गत कुपनालिका व विहीर खोदकाम केलेल्या ठिकानाहून पाइपलाइन करुण पाणी पुरवठा केला जात होता. मात्र, तेथेही पुरेसा पाणीसाठा नसल्याने पाडळसरे येथील राधाबाई दत्तात्रय पाटील ,रवींद्र पांडुरंग पाटील यांच्या विहीरी अधिग्रहित केल्या आहेत. तीन ठिकाणाहूण पाणी गावात एकत्र केले जाते व गावात पाणी पुरवठा केला जातो. मात्र, पाणी जेमतेम असल्याने गावात प्रत्येक भागात पाणी पुरवठा हा टप्पा टप्प्यात केला जातोय. यात पंचवीस दिवसात पाणी पुरवठा होत आहे. गावात कुपनलिका असूनही त्या नादुरुस्त असल्याने त्यांचा वापर होत नाही. कुपनलिका दुरुस्तीसाठी पंचायत समितीकडे तक्रार करूनही त्याकडे दुर्लक्ष होत आहे. गावात जवळपास कुठेच पाण्याची सोय नसल्याने पिण्याच्या पाण्याबरोबर जनावरांना व वापरण्यासाठी पाणी नसल्याने परिस्थिती गंभीर बनली आहे.

 

 

कुपनलिका दुरूस्त करण्यासाठी आलेल्या जबाबदार कर्मचारी यांच्याकडे कुपनलिका दुरुस्तीसाठी लागणारे साधन सामग्रीच पुरेसी नसल्याने थूंक लावून कागद चिपकविण्याचा प्रकार सुरु असल्याचे दिसून येत आहे. मागील पंधरा दिवसापूर्वी न्यू प्लॉट भागात कुपनिलका दुरुस्तीला आलेल्या कर्मचारी त्या कुपनलीकातील लोखंडी पाईप खराब झाल्याने ते बदलवीने गरजेचे असताना वरचा एकच पाईप बदलवून कर्मचारी त्याठिकाणाहून नऊ दो ग्यारा होतात. परिणामी त्या कुपनलिकेवर सद्यस्थितीत पुरेसे पाणी येत नसल्याने तीव्र संताप व्यक्त होत आहे. तर याच भागात मागील दोन वर्षापासून नादुरुस्त कुपनालिका दुरुस्त करण्यासाठी ग्रामपंचायतसह पंचायत समितीकडे वेळ नसल्याने त्याचे परिणाम सर्व सामान्य ग्रामस्थाना भोगावे लागत आहेत. एकीकडे शासन पाणी टंचाई काळात टंचाईग्रस्त गावाना टॅकरवर पाणी पुरवठा करण्यासाठी ,विहीर अधिग्रहित करण्यासाठी लाखो रुपये खर्च करीत आहेत. मात्र या जीवंत कुपनलिका दुरुस्त करण्यासाठी पुरेसे साहित्य उपलब्ध होत नसल्याने शासनाच्या चालढकल कामाच्या बाबतीत तीव्र संताप व्यक्त होत आहे.

Add Comment

Protected Content