शहराचा पाणीपुरवठा शनिवारपासून सुरळीत

jalgaon municipal corporati

जळगाव (प्रतिनिधी ) शहराला पाणीपुरवठा वाघुर धरणावरून करण्यात येणाऱ्या प्रमुख जलवाहिनीला मेहरुण रस्त्यावरील घुगे-पाटील केरोसीन वर्कशॉप जवळ मोठी गळती लागल्याने शहराचा पाणी  पुरवठा पून्हा एक दिवसाने पुढे ढकलण्यात आला  होता. पाणीपूरवठा विभागाने रात्री उशीरा पर्यंत काम पूर्ण केले असून उद्या (ता.6) नियोजीत वेळापत्रकानूसार शहरात पाणीपुरवठा केला जाणार आहे.

महापालिकेतर्फे वाघुर जलवाहिनीला लागलेल्या मोठ्या गळती दुरुस्त करण्याची मोहीम दोन महिन्यापूर्वी हाती घेतली. त्यात जळगाव विमानतळाजवळ व हॉटेल कस्तुरीजवळ व्हॉल दुरुस्तीच काम पाणीपुरवठा विभागाने गुरूवारी (ता.4) हाती घेतले होते. हे काम पूर्ण होत नाही तोच मेहरुण रस्त्यावरील 1200 मीमी व्यासाची गिरणा टाकीला जोडली जाणारी मुख्य जलवाहिनी फुटली. त्यानंतर त्वरीत पाणीपूरवठा विभागाने जलवाहिनी दुरुस्तीचे काम हाती घेऊन नविन लोखंडी 5 मीटरचा पाईप जोडावा लागला. रात्री उशीरा पर्यंत हे काम पूर्ण झाले असून विस्कळित पाणीपुरवठा नियमित उद्या (ता.6) शहरात होणार आहे अशी माहिती महापालिकेचे पाणी पुरवठा अभियंता डी. एस. खडके यांनी दिली.

शनिवारी या भागात पाणीपुरवठा 
नटराज टाकी ते चौघुले मळा, शनीपेठ, बळीरामपेठ, शनीपेठ, नवीपेठ, हौसिंग सोसायटी, प्रतापनगर, गेंदालाल मिल, खडके चाळ, इंद्रप्रस्थ नगर, के. सी. पार्क, गेंदालाल मिल हुडको, रिंगरोड, भोईटे नगर, भिकमचंद जैन नगर, आकाशवाणी, जुनेगाव, सिंधी कॉलनी, इंडिया गॅरेज, ओंकारनगर, जोशीपेठ, हेमुकलाणी टाकीवरील परिसर, गणेशवाडी, कासमवाडी, सम्राट कॉलनी, ईश्‍वर कॉलनी, वर्षा कॉलनी, सुप्रिम कॉलनी, डी. एस. पी. टाकीवरील तांबापुरा, गणपती नगर, आदर्श नगर, प्रभात कॉलनी, ब्रुकबॉण्ड कॉलनी या भागात पाणीपुरवठा होणार आहे

रविवारी या भागात पाणीपुरवठा 
वाल्मिकनगर, कांचननगर, दिनकर नगर, असोदा रोड, रामेश्‍वर कॉलनी, एम. डी. एस कॉलनी, मास्टर कॉलनी, अक्‍सानगर, अयोध्यानगर, शांतिनिकेतन, गृहकुल कॉलनी, म्हाडा कॉलनी, अजिंठा सोसायटी, मोहननगर, नेहरूनगर, हरिविठ्ठल नगर, पिंप्राळा गावठाण परिसर, दांडेकर नगर, मानराजपार्क, असावा नगर, निसर्ग कॉलनी, द्रौपदी नगर, मुक्ताईनगर, धनश्रीनगर, पोलिस कॉलनी, खोटेनगर, गेंदालाल मिल, शिवाजीनगर हुडको, प्रजापत नगर, एस.एम.आयटी परिसर, योगेश्‍वर नगर, हिरापाईप, शंकरराव नगर, खेडीगाव परिसर, तांबापुरा, शामाफायर, वाघनगर, हरिविठ्ठल नगर, शिवकॉलनी, विद्युत कॉलनी, राका पार्क, पोस्टल कॉलनी, विवेकानंद नगर, जिल्हारोड, रामदास कॉलनी, शारदा कॉलनी, महाबळ कॉलनी, ऑफिसर क्‍लब.

सोमवारी या भागात पाणीपुरवठा 
खंडेराव नगर, पिंप्राळा गावठाण, पिंप्राळा हुडको, सेंट्रल बॅंक कॉलनी, आशाबाबा नगर, मानराज टाकी परिसर, शिंदे नगर, अष्टभुजा, वाटिकाश्रम, निवृत्ती नगर, कल्याणीनगर, दादावाडी, हिराशिवा कॉलनी, आहुजानगर, निमखेडी, नित्यानंदनगर, संभाजी नगर, रायसोनी नगर, समतानगर परिसर, सानेगुरुजी कॉलनी, पार्वतीनगर, शिवरामनगर, यशवंतनगर, गिरणा टाकी आवारातील उंच टाकी, भगवाननगर, रामानंद नगर, कोल्हे नगर, अंबिका सोसायटी, शिवकॉलनी, गणेश कॉलनी, श्रीकृष्ण कॉलनी.

 

Add Comment

Protected Content