खामगाव प्रतिनिधी । येथील पाणी पुरवठा खंडित झाल्यामुळे अभूतपुर्व टंचाई निर्माण झाली असून नागरिकांची मोठ्या प्रमाणात गैरसोय होत आहे.
याबाबत वृत्तांत असा की, खामगावात सध्या मोठ्या प्रमाणात पाणी टंचाई जाणवत असून नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. नांदुरा पाठोपाठ खामगाव चाही पाणीपुरवठा विस्कळीत खामगाव गेरू माटरगाव येथील धरणातील पाणी पातळी खालावल्याचे फटका फेब्रुवारी महिन्यातच बसत आहे. त्यामुळे धरणातील पाणीपातळी खोल गेल्यामुळे जॅकवेल मध्ये पंपिंग साठी आवश्यक असलेले पाणी उपलब्ध होत नाही. यामुळे सध्या आगामी चार दिवस शहराचा पाणीपुरवठा विस्कळीत राहणार आहेत. फेब्रुवारी महिन्यातच या प्रकारच्या पाणी टंचाईला तोंड द्यावे लागत असल्यामुळे आगामी काळात स्थिती अजून भयावह बनणार असल्याचे संकेत मिळाले आहेत.