चाळीसगाव प्रतिनिधी । गेल्या वर्षभरात कमी पाऊस झाल्याने चाळीसगाव तालुक्यातील लघुपाटबंधारे कोरडे ठाक असून या गावातील महिला व पुरुषांना पाण्यासाठी वणवण भटकावे लागत आहे.
यातील वीस गावांना आज प्रशासनाकडून टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात असून १५ गावांमध्ये विहिरींचे अधिग्रहण केले गेले आहे. मार्च महिन्याच्या अखेरीस ही परिस्थिती असून एप्रिल मे जून पर्यंत तालुक्यातील इतरही गावांना पाण्याची भीषण टंचाई भासणार असल्याचे चित्र दिसून येत आहे. तर गुरांना देखील चार्याची मोठ्या प्रमाणावर त्यांचाही निर्माण झाली असून माणसांपेक्षा गुरांचा पाण्याचा प्रश्न मोठ्या प्रमाणावर भेडसावत आहे. कारण शिवार जंगलात पाणीसाठे झाल्यामुळे जनावरांना पिण्यास पाणी दुरापास्त झाल्याचे चित्र निर्माण झाले आहे.
चाळीसगाव तालुक्यातील नाईक नगर तांडा नंबर १ ब्राम्हण शेवगे रोहिणी हादगाव विसापूर तांडा भिल्ल वस्ती अंधारी करजगाव, तमगव्हाण, चितेगाव, चिंचगव्हाण, सुंदर नगर, पिंपळगाव, घोडेगाव, न्हावे, दस्केबर्डी, खेडी खुर्द, वाघळी तळोदे प्र दे, पिंपरी बुद्रुक, ढोमणे आदी गावांमध्ये तीव्र पाणीटंचाई जाणवत असून येथे टँकरने पाणी पुरवठा होत आहे. तर पिंपरी बुद्रुक प्रचा, बोढरे, तळेगाव, सुंदर नगर, चिंचगव्हाण, हिरापुर, शिंदी, राजमाने, चत्रभुज तांडा शिवापूर, रामनगर, ढोमणे आदी गावांमधील विहिरी अधिग्रहीत करण्यात आल्या आहेत.