लासूर ता.चोपडा, प्रतिनिधी | येथील जलसंधारण मंच तसेच चोपडा पीपल्स बँक सामाजिक सेवा ट्रस्ट यांच्यातर्फे गेल्यावर्षी सातपुड्याच्या पायथ्याशी काठेवाडी वस्तीत नाला खोलीकरण करून मोठ्या प्रमाणात जलसाठा होईल या हेतूने तलाव बनवण्यात आला होता. त्या तलावात यंदा मोठ्या प्रमाणात जलसाठा झाल्यामुळे येथे जलपूजनाचा कार्यक्रम नुकताच उत्साहात पार पडला.
मागील वर्षीच्या असमाधानकारक पावसामुळे तलावात पाहिजे त्या प्रमाणात पाणी साठू शकले नव्हते पण यावर्षी परिसरात झालेल्या समाधानकारक पावसामुळे तलाव ओव्हरफ्लो झाल्याने युवकांच्या कार्याला यश प्राप्त झाले आहे. या तलावातील जलसिंचनामुळे लासुरला मोठा फायदा होणार आहे. त्यामुळे या कामाचे गावकऱ्यांकडून कौतुक होत आहे. येथील उपसरपंच अनिल वाघ यांचा मार्गदर्शनाखाली जलसंधारण मंचाचे सदस्य आत्माराम पाटील, महेश माळी, विनोद महाजन, परेश पालीवाल, राहुल पाटील, विशाल पालीवाल, गणेश जैस्वाल, विरेंद्र जैन, रिजवान मण्यार आदी सभासद सामाजिक कार्यात सहभाग घेत असतात.
माजी विधानसभा अध्यक्ष अरुणभाई गुजराथी यांचा हस्ते फलक अनावरण तसेच जलपूजन सोहळा पार पडला. यावेळी चोपडा पीपल्स बँकेचे चेअरमन चंद्रहास गुजराथी, अजय पालीवाल, उपेंद्र पाटील, विक्रम जावरे यांनी मनोगत व्यक्त केले. याप्रसंगी राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष राजेंद्र पाटील, रघुनाथ महाजन, शंकर माळी, रतीलाल महाजन, हिम्मत गुरुजी, ओमप्रकाश पालीवाल, रघुनाथ मगरे, सोमनाथ सोनार, कल्याण पाटील, राष्ट्रवादी लासुर शहराध्यक्ष लीलाधर पाटील, नौमिल पटेलिया, नरेंद्र महाजन, बाळू सोनवणे, मगन महाजन, कुंदन बोरसे, लक्ष्मण बाविस्कर, संदीप जावरे, श्रीराम पाटील, जिजाबराव पाटील, कडू पाटील, शिवाजी पाटील, मनोहर पाटील, राजेंद्र बिडकर, राजू महाराज, बाळू पाटील व भास्कर पाटील आदी उपस्थित होते.