जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । तालुक्यातील निमगाव शिवारातील वाघूर नदीच्या काठावरून शेतकऱ्याची १० हजार रूपये किंमतीची पाण्याचा मोटार चोरट्यांनी चोरून नेली आहे. याप्रकरणी नशिराबाद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.
नशिराबाद पोलीसांकडून मिळालेली माहिती अशी की, रविंद्र कौतीक सुरवाडे (वय-६१) रा. शांती नगर जळगाव हे सेवानिवृत्त पोलीस कर्मचारी आहे. शेती करून आपला उदरनिर्वाह करतात. निमगाव शिवारातील वाघूर नदीवरून त्यांनी पाण्याची मोटार लावली आहे. दरम्यान, अज्ञात चोरट्यांनी ८ जून ते ९ जून दरम्यान १० हजार रूपचे किंमतीची पाण्याची मोटार चोरून नेल्याचा प्रकार उघडकीला आला आहे. याप्रकरणी शेतकरी रविंद्र सुरवाडे यांनी नशिराबाद पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली. त्यांच्या तक्रारीवरून अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक फौजदार रविंद्र तायडे करीत आहे.