रावेर (प्रतिनिधी) तालुक्यातील निरूळ, पाडळा, खानापुर, चोरवड या गावात पाणी पातळी दिवसेंदिवस खाली जात आहे. पिकांना वाचवण्यासाठी जि.प. सदस्या रंजना प्रल्हाद पाटील यांच्या पुढाकाराने सुमारे ४० हजार रुपये मोबदला लघुसिंचनाकडे भरण्यात आला आहे. त्यामुळे ०.४५ दलघमी पाणी नागाई नदवरील गंगापूरी धरणातुन आर्वतन सोडण्यात आलेय. शुक्रवार पासुन पाणी नदीपात्रात सोडल्याने शनिवारी निरुळ जवळ पात्र वाहत होते.
शुक्रवारी पाडळा येथिल सुरेश पाटील, राजू महाजन, उपसरपंच रमजान तडवी यांच्या उपस्थितीत गंगापूर धरणावरून आवर्तन सोडण्यात आले. शनिवार पर्यंत हे पाणी निरुळ गावाजवळ पोहोचले. गंगापूरी धरणातून सोडण्यात आलेल्या पाण्यामुळे निरूळ, पाडळा,खानापूर, चोरवड या भागातील तळ गाठत असलेल्या विहिरींना संजीवनी ठरणार असून भागातील विहिरीच्या पाणी पातळीत वाढ होण्यास मदत होणार आहे.