चाळीसगाव प्रतिनिधी । तालुक्यातील रांजणगाव येथे पाणी फाऊंडेशन आयोजित वाटर कप स्पर्धा अंतर्गत श्रमदानाचे कार्य सुरू झाले आहे. वसुंधरा फाउंडेशन चाळीसगावचे संस्थापक सचिन पवार यांनी यासाठी आवश्यक ४० पावडी २० टिकम ३० घमेले वसुंधरा फाउंडेशनतर्फे नुकतेच रांजणगाव ग्रामपंचायतीला दिले. यावेळी सरपंच सोनाली शेखर निंबाळकर, वसुंधरा फाउंडेशन सचिव सुनिल भामरे, अंजली भामरे उपस्थित होते. वसुंधरा फाउंडेशनच्या कार्याचे आयकर आयुक्त डॉ.उज्वल चव्हाण, डॉ उज्वला देवरे, शेखर निंबाळकर, डॉ मनोहर भामरे स्वागत केले आहे.
वाटर कप अंतर्गत श्रमदानासाठी ग्रामपंचायतीस साहित्यांची मदत
6 years ago
No Comments