फैजपूर प्रतिनिधी । फैजपूर, खिरोदा, आमोदा परिसरातील शेतकरी बांधव एकत्र येवून लोकसहभागातून जलसंधारणाचे काम चांगल्याप्रकारे केले जात आहे, ही बाब कौतूकास्पद असल्याचे आमदार शिरीष चौधरी यांनी सांगितले.
मोर नदी पात्रात जे.सी.बी पूजन करून आ.शिरीष चौधरी, महामंडलेश्वर जनार्दन हरीजी महाराज, प्रांताधिकारी कैलाश कडलग, जि.प.सदस्य प्रभाकर सोनवणे, माजी प.स.सभापती लीलाधर चौधरी, व आमोदा येथिल शेतकरी याचाहस्तेपूजन करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते.
फैजपूर शहरातील धाडी नदीपात्रात जुन्या कोचुर रस्ता, खिरोदा रस्त्यावर असलेल्या फिल्टर प्लांटजवळ व परिसरातील आमोदा रस्त्यावर असलेल्या मोर नदी पत्रात उभ्या आडव्या चर खोलीकरण काम लोकसहभागातून होत आहे. त्यामुळे या कामामुळे पाण्याची पातळी वाढणार आहे, यासाठी परिसरात शेतकरी बांधव एकत्र येऊन लोकसहभागातून एक चांगले काम या ठिकाणी होत आहे.
यासाठी शासनाकडून आवश्यक मदत मिळवून देणार असल्याचे यावेळी आमदार शिरीष चौधरी यांनी सांगितले तर महामंडलेश्वर जनार्दन हरीजी महाराज यांच्या कार्याचे कौतुक केले. परिसरात या लोकसहभागातून होणाऱ्या ‘पाणी अडवा पाणी जिरवा’ या ही संकल्पना खूप महत्वाकांक्षी असून यासाठी कोरोना परिस्थिती असताना सुध्दा असताना परिसरातील शेतकरी एकत्र येऊन एक चांगला उपक्रम राबवित आहे. या कार्याचे त्यांनी कौतुक करत शासनाद्वारे जे काही मदत होईल त्यासाठी प्रयत्नशील असल्याचे सांगितले.
यावेळी उपस्थित शेतकरी याचा सत्कार मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला. याप्रसंगी नगरसेवक केतन किरंगे, कलीम खान मन्यार, देवेंद्र बेंडाळे, प्रा.डॉ.व्ही.आर पाटील, प्रा.डॉ.आर.एल.चौधरी, जलसंधारण सेवानिवृत्त अधिकारी किशोर पाटील, काँग्रेस शहराध्यक्ष शेख रियाज, युवक शहराध्यक्ष वसीम तडवी, वसीम जनाब, आसिफ मॅकेनिकल, गणेश गुरव, रामाराव मोरे, पिंटू हंसकर सह परिसरातील शेतकरी बांधव उपस्थित होते.