आभोणे तांडा येथे जलसंधारणासाठी महाश्रमदान

WhatsApp Image 2019 05 12 at 9.37.17 AM

चाळीसगाव (प्रतिनिधी) पाणी फाऊंडेशनच्या माध्यमातून चाळीसगाव तालुक्यातील आभोणे तांडा येथे जलसंधारणच्या कामासाठी जळगाव जिल्हा परिषदेच्यावतीने जिल्ह्यातील पाचोरा ,भडगाव, चाळीसगाव तालुक्यातील सर्व विभागांचे अधिकारी व कर्मचारी श्रमदानासाठी पहाटे ६ वाजेपासून उपस्थित होते.

 

जलसंधारण कामांसाठी सहाय्यक जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. समाधान वाघ , वैद्यकीय अधिकारी डाॅ. प्रशांत पाटील, डाॅ. प्रशांत शेळके , रोटरी मिलेनियमचे अध्यक्ष तथा तळेगाव आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डाॅ. प्रमोद सोनवणे, डाॅ. योगेश पाटील, डाॅ .विजय पाटील ,डाॅ. राजेश चौधरी व आरोग्य कर्मचारीवृंद मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी ग्रामस्थासह जेष्ठ महिला जलमिञ जमुनामायच्यासह अधिकारी व कर्मचारींना रोटरी मिलेनियम अध्यक्ष डाॅ . प्रमोद सोनवणे यांनी पाणीबचतीची शपथ घेतली. पाणी फाऊंडेशनच्या माध्यमातून सुनिल पाटील, कळमडू पोलिस पाटील सुनिल मोरे,ग्रामपंचायत सदस्य कैलास महाले व निर्मला रोहिदास राठोड यांनी उपस्थितांचे स्वागत केले. याप्रसंगी चाळीसगाव बीडीओ अतुल पाटील , पाचोरा बीडीओ गणेश चौधरी,सहाय्यक बीडीओ अजितसिंग पवार, आदींसह सर्व विस्तार अधिकारी, अंगणवाडी पर्यवेक्षिका , ग्रामविकास अधिकारी, ग्रामसेवक, शिक्षक, आरोग्य कर्मचारी, अंगणवाडी सेविका, आशा स्वयंसेविका आदी उपस्थित होते.

Add Comment

Protected Content