अमळनेरात गीत गायन स्पर्धा रंगली ; पो.नि. बडगुजर यांच्या गीताला श्रोत्यांची पसंती (व्हिडीओ)

ed649730 3593 4195 b4ba 46095d515b19

 

अमळनेर (प्रतिनिधी) पूज्य साने गुरुजी ग्रंथालय व मोफत वाचनालय अमळनेर संचलित पूज्य साने गुरुजी मोफत स्पर्धा मार्गदर्शन केंद्राच्या वतीने स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन व व्यक्तिमत्व विकास कार्यशाळा सुरू आहे. त्याअंतर्गत 11 मे 2019 रोजी गीत गायन स्पर्धेचा कार्यक्रम बहारदार झाला. यावेळी पोलीस निरीक्षक अनिल बडगुजर यांच्या ‘दिल का आलम’ या गाण्याला श्रोत्यांनी दिलखुलास प्रतिसाद दिला.

 

 

गेल्या 8 मे पासुन विविध स्पर्धांचे व मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आलेले आहे. त्यात विविध क्षेत्रातील पदाधिकारी अधिकारी यांच्या भेटीमुळे कार्यक्रमाची उंची वाढली आहे. 11 मे 2019 रोजी गीत गायन स्पर्धेचा कार्यक्रम बहारदार झाला. सकाळच्या सत्रात प्रमुख अतिथी संदीप पाटील कर सहाय्यक, हर्षा पाटील कर सहाय्यक, राहुल पाटील पारपत्र विभाग, स्वप्नील वानखेडे एस.टीआय मुंबई, शिक्षण विस्तार अधिकारी अशोक बि-हाडे, युनियन बँकेचे उदय पाटील, सेवानिवृत्त पीएसआय बैसाणे होते तर पहिल्या सकाळ सत्राचे अध्यक्ष सानेगुरुजी वाचनालयाचे संचालक ईश्वर महाजन होते. कार्यक्रमाचे प्रस्ताविक स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्राचे संचालक विजय सिंग पवार यांनी केले. व्यासपीठावरील स्पर्धा परीक्षेतून अधिकारी झालेल्या मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त करून स्पर्धा परीक्षेच्या कार्यशाळेत विद्यार्थी व विद्यार्थिनींना अनमोल मार्गदर्शन केले. एकंदरीत त्यांच्या मनोगतातून असे सांगितले की, मनात आणले तर आपण काहीही होऊ शकतो. तरुणांमध्ये एवढी ऊर्जा आहे तिचा योग्य वापर करणे गरजेचे आहे. परिस्थिती आणि शिक्षणाचा काही संबंध नाही. संधी प्रत्येकाला मिळते तीच सोनं करणे गरजेचे आहे, असे सांगितले. अध्यक्षीय भाषणातून ईश्वर महाजन यांनी वाचनालयाच्या उपक्रमाला शुभेच्छा दिल्या.

 

 

दुसऱ्या सत्रात कार्यक्रमाचे अध्यक्ष सानेगुरुजी वाचनालयाचे अध्यक्ष दिलीप सोनवणे होते व्यासपीठावर पोलीस निरीक्षक अनिल बडगुजर, कर सहाय्यक हर्षा पाटील, मुख्याध्यापक विजय सोनवणे, प्रकाश पाटील,साहित्यिक भाऊसाहेब देशमुख, ग.स.संचालक श्यामकांत भदाणे , नारायण पाटील शिरसाळे, होते. विचार पिठावरील मान्यवरांनी साने गुरुजी व स्वामी विवेकानंद यांच्या पुतळ्याला हार अर्पण करून गितगायन स्पर्धेला सुरवात झाली. गीत गायन स्पर्धेमध्ये गुरुदेव आर्केस्ट्रा चे संचालक सतीश कागणे यांच्या उत्कृष्ट गायकांनी कार्यक्रमाची सुरुवात झाली. त्यात छोटे बाल कलाकार यांनी गाणे सादर केल्याने मान्यवरांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला. अमळनेरचे पोलीस निरीक्षक अनिल बडगुजर यांनी आपल्या गोड आवाजाने ‘दिल का आलम’ हे गाणे सादर करत श्रोत्यांची माने जिंकली. गीत गायन स्पर्धेमध्ये बाल गोपाल पासून तर मोठ्यांपर्यंत सर्वांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला व आपल्या गाण्याने गितगायन स्पर्धा उत्कृष्ट पार पडली. व कार्यक्रमांमध्ये ऊर्जा निर्माण केली.

 

 

यावेळी कर सहाय्यक हर्षा पाटील यांनी मुलीही अधिकारी होऊ शकतात. या विषयावर स्पर्धा परीक्षा कार्यशाळेत मार्गदर्शन करतांना सांगितले की, परीक्षेला सामोरे जातांना नियोजन महत्त्वाचे आहे. आपल्याला ज्या क्षेत्रात करीयर करायचे असेल खुप मेहनत करा,जिद्द, चिकाटी व स्वतः मध्ये आत्मविश्वास असेल. तर तुम्हाला अधिकारी होण्यापासून कोणीच रोखू शकणार नाही. मी कर सहाय्यक पदापर्यंत पोहचविण्यासाठी कोणत्या अडचणी आल्या याबाबत स्वतः च्या आठवणी सांगितल्या. यावेळी स्पर्धा परीक्षेचे संचालक विजय सिंग पवार,पत्रकार उमेश काटे ,व्हि.एन.ब्राह्मणकर ,सतीश कांगणे शरद पाटील, सोपान भवरे यांनी कार्यक्रमाचे नियोजन केले. यावेळी कार्यक्रमास सानेगुरुजी वाचनालयाचे विश्वस्त चंद्रकांत नागावकर, संचालक एडवोकेट रामकृष्ण उपासनी ,भीमराव जाधव,ईश्वर महाजन, शिक्षक,बंधू व भगिनी मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते.

 

Add Comment

Protected Content