Home राजकीय ‘आता बघाच तो व्हिडीओ’ राज ठाकरेंना भाजपाचे प्रत्युत्तर

‘आता बघाच तो व्हिडीओ’ राज ठाकरेंना भाजपाचे प्रत्युत्तर


download 16

मुंबई (वृत्तसंस्था) मोदीमुक्त भारताची हाक देऊन लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात उतरलेल्या व व्हिडिओंच्या माध्यमातून मोदी सरकारच्या कारभाराची पोलखोल करणाऱ्या मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना भाजपने आज त्यांच्याच भाषेत प्रत्युत्तर दिले. मुंबई भाजपचे अध्यक्ष आशिष शेलार यांनी राज यांचा प्रत्येक आरोप फोटो व व्हिडिओचे पुरावे दाखवून खोडून काढला. ‘राज ठाकरेंचा प्रचार फसला आहे. त्यांचा खोटा प्रचार विकला जाणार नाही’, असे शेलार यांनी स्पष्ट सांगितले ‘आता बघाच तो व्हिडीओ’ अशी थीम घेवून शेलार यांनी हा कार्यक्रम केला.

 

मोदी व शहा हे देशावरचं संकट आहे. हे संकट दूर करा, असे आवाहन राज ठाकरे प्रचारसभांच्या माध्यमातून जनतेला करत आहेत. मोदींच्या कारभाराची चिरफाड करणारे व्हिडिओही ते दाखवत आहेत. त्यामुळे भाजपने राज यांना प्रत्युत्तर देण्यासाठी मुंबईतील रंगशारदा सभागृहात हा खास मेळावा घेतला होता. ‘आता बघाच तो व्हिडिओ… खोलो इसका ‘राज’… अशी या मेळाव्याची थीम होती. राज यांच्या आरोपांना उत्तर देताना शेलार यांनी यावेळी भाजप व सरकारची बाजू मांडली. बालाकोट एअर स्ट्राइक, पंतप्रधानांच्या दत्तक गावातील वास्तव, मोदी-शहांची हुकूमशाही यावरही शेलार यांनी यावेळी राज यांच्या आरोपांची सत्य स्थिती दर्शवणारा खुलासा केला.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Protected Content

Play sound