जळगाव प्रतिनिधी । खासगी काम आटोपून घरी परतत असतांना अज्ञात वाहनाच्या धडकेत बोदवड तालुक्यातील वराड येथील 20 वर्षीय तरूण गंभीर झाला. मात्र जिल्हा रूग्णालयात उपचारार्थ दाखल केले असता वैद्किय अधिकारी यांनी मृत घोषीत केले.
मिळालेल्या माहितीनुसार, बोदवड तालुक्यातील हकीम इब्राईम मुलताणी वय-20 रा. वराळ ता. बोदवड हा तरूण आपले खासगी काम आटोपून बोदवड जामनेर रोडवरील वाकी रोडवरून घरी जात आसतांना मागून येणाऱ्या अज्ञात वाहनाने जोरादार धडक दिली. यात हकीम याच्या डोक्याला गंभीर दुखापत व डाव्या खांद्यावर त्याला प्राथमिक उपचारार्थ बोदवड येथे दाखल केले. मात्र प्रकृती अधिक खालावल्याने त्याला जिल्हा रूग्णालयात उपचारार्थ दाखल केले असता वैद्यकिय अधिकारी डॉ. प्राची सुरतवाला यांनी मृत घोषीत केले. याप्रकरणी जिल्हा पेठ पोलीसात वैद्यकिय अधिकारी डॉ. सुरतवाला यांच्या खबरीवरून आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली.