जळगाव (प्रतिनिधी) शहरातील आकाशवाणी चौकात मुख्य मार्गाला लागून असलेल्या फुटपाथवर काही व्यावसायिकांनी खासगी जाहिरातीचे फलक लावल्याने त्याचा वापर करणाऱ्या पादचाऱ्यांची मोठी अडचण होत आहे.
या चौकात नेहमीच रहदारी मोठी असते, त्यातच फुटपाथवर अशाप्रकारे खाजगी जाहिरातीचे फलक लावले तर पायी चालणाऱ्यांची मोठी अडचण होत आहे. त्यामुळे हे फलक लवकरात लवकर हटवण्यात यावे, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.