पहूर ता. जामनेर । अपहरण झालेल्या वाकडी ( ता. जामनेर ) येथील ग्रामपंचायत सदस्य विनोद चांदणे यांचा मृतदेह पाचोरा तालुक्यातील मोहाडी येथील विहीरीत आढळून आला. तसेच या प्रकरणातील संशयीत प्रमुख आरोपी माजी सरपंच शेखर वाणी यांस पोलीस उपनिरीक्षक किरण बर्गे, अनिल देवरे यांच्या विशेष पथकाने पंढरपुर येथून ताब्यात घेतले. दरम्यान दोषी आरोपीना अटक करण्याची मागणीसाठी आज सायंकाळी मयत विनोद चांदणे नातेवाईकांना शासकीय वैद्यकिय महाविद्यालयात ठिय्या मांडला होता.
मोहाडी शिवारात आढळला मृतदेह
साजगांव ते मोहाडी रस्त्यावरील एका विहीरीत 27 मार्च रोजी सायंकाळी सहाच्या सुमारास चांदणे यांचा मृतदेह हातपाय बांधलेल्या अवस्थेत आढळून आला. मृतदेहाला दोन मोठे वजनदार दगड बांधलेले होते. उपविभागीय पोलीस अधिकारी ईश्वर कातकडे, पहूरचे सहाय्यक पोलीस निरीक्षक दीलीप शिरसाठ, पिंपळगांवचे सहाय्यक पोलीस निरीक्षक गजेंद्र पाटील यांनी स्थानीक ग्रामस्थांच्या मदतीने शुक्रवारी सकाळी मृतदेह विहीरी बाहेर काढला. रात्रभर विहीरीवर पोलीसांनी खडा पहारा दिला.
अखेर वाणी अटकेत
या प्रकरणातील मुख्य सुत्रधार माजी सरपंच शेखर वाणी याच्या अटकेसाठी काल पहूर पोलीस ठाण्यावर मातंग समाजाच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात आले होते .आज अखेर त्यास विशेष पथकाने ताब्यात घेऊन जेरबंद केले. तसेच 23 रोजी अटक करण्यात आलेल्या महेंद्र शामलाल राजपूत, विनोद सुरेश देशमुख आणि नामदार गुलाब तडवी यांना न्यायालयापुढे त हजर करण्यात आले असता त्यांना 1 एप्रील पर्यंत पोलीस कोठडी सुणावण्यात आली. सदर प्रकरणाचा तपास पोलीस अधीक्षक पंजाबराव उगले, अप्पर पोलीस अधीक्षक प्रशांत बच्छाव यांच्या मार्गदर्शनाखाली उपविभागीय पोलीस अधिकारी ईश्वर कातकडे, पोलीस उपअधिक्षक केशव पातोंड, सहाय्यक पोलीस निरीक्षक दीलीप शिरसाठ करीत आहेत.