यावलमध्ये दमदार पावसाची अपेक्षा

यावल प्रतिनिधी । तालुक्यातील काही ठिकाणी पाऊस पडला असला तरी पेरणीसाठी आवश्यक असणारे पर्जन्यमान न झाल्यामुळे शेतकर्‍यांच्या नजरा आकाशाकडे लागल्या आहेत.

जुनचा महीना समाप्त होण्याच्या मार्गावर असतांनाही पाऊस हा लांबणीवर पडल्याने शेतकरी बांधव चिंतातुर झाले असुन शेत पेरणीसाठी लागणारे बिबियाण्याच्या कृषी केंद्रांवर शुकशुकाट दिसुन येत आहे. तालुक्यात २१ जुन रोजी दुपारी २ते ४ वाजेच्या दरम्यान मोहराळा, हरीपुरा, सावखेडा सिम , दहिगाव डोंगर कठोरा, बोरखेडा शिवार, हिंगोणा . सांगवी बु., आदी ठिकाणी पावसाने हजेरी लावली. यामुळे पेरणीस सुरुवात होणार नसली तरी मागील चार महीन्यांपासुन ४५ अंशाच्यावर गेलेल्या उन्हाच्या चटक्यांनी त्रस्त झालेल्या नागरीकांना थोडासा गारवा मिळाल्याचे दिसुन आले आहे. मात्र दमदार पाऊस झाल्याशिवाय पेरणी शक्य नसल्यामुळे शेतकर्‍यांच्या नजरा आकाशाकडे लागल्या आहेत.

Protected Content