जळगाव प्रतिनिधी । हरिविठ्ठल नगरातील जिजामाता माध्यमिक विद्यालयात आज दि. 20 जुलै रोजी सकाळी 8 वाजता रोटरी क्लब ऑफ जळगावतर्फे ‘सात बाय सात बाय सात’ या अंतर्गत चेतना व्यसनमुक्ती केंद्राचे नितीन विसपुते यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले.
‘सात बाय सात बाय सात’ कार्यक्रम म्हणजे शाळेचे ध्येय हे सात शाळा, सात व्याख्यान व सात कार्यक्रम रोटरी क्लब ऑफ जळगावच्या माध्यमातून एका वर्षात पुर्ण करण्याचे आहे. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष नितीन विसपुते यांनी सांगितले की, जीवनात आनंदी राहण्यासाठी कायमस्वरुपी व्यायाम केला पाहिजे. मुलांनी फास्ट फूड न खाता दैनंदिन पौष्टिक आहार घेणे गरजेचे आहे. तसेच 8 तास झोप घ्यावी व व्यसनांपासून कायम दूर राहावे. पुस्तकांशी मैत्री करा, सर्वांना मदत करा, आनंदी राहण्यासाठी गाणे गुणगुणावे व बऱ्यासा गोष्टीबद्दल मार्गदर्शन यावेळी करण्यात आले. यावेळी विद्यालयाचे मुख्याध्यापक राजेंद्र खोरखेडे, लता इखनकर, संजय खैरनार, आशा पाटील, संगीता पाटील, कृष्णा महाले, दिनेश सोनवणे, विकास तायडे, शैलजा चौधरी, सागर भारुडे, योगेश पवार, रुकसाना तडवी, जगदीश शिंपी, प्रशांत मडके आदी उपस्थितीत होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार संजय खैरनार यांनी मानले आहे.