यावल-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | येथील महर्षी व्यास मंदिरात काकडा आरतीचा मासिक महोत्सव नुकताच उत्साहात पार पडला.
असंख्य भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या प्रसिद्ध श्री महर्षी व्यास मंदिरात एक महिन्यापासून सुरु असलेल्या काकड आरती महोत्सवाचा सांगता समारोप आज दिनांक ११ नोव्हेबर शुक्रवार रोजी परंपरागत पध्दतीने पार पडला. गेल्या महिन्यापासून काकड आरतीचा स्वर गुंजत असून श्रीगणेशाची भूपाळ श्री विठ्ठलाची भपाळी श्रीरामाची भूपाळी श्रीशंकराची भूपाळी तालासुरात म्हणण्यात येऊन श्रीपांडुरंगाची आरती श्रीरामाची आरती म्हणण्यात येते.
संपूर्ण महिनाभर पुरूष तसेच महिला भाविकांनी एकत्र काकड आरती म्हणून कार्यक्रमाची शोभा वाढविली.या काकड आरतीचया गजराने संपूर्ण परिसरात चैतन्य निर्माण झाले.मंदिरात या वेळी सुशोभीकरण करण्यात आले होते. याप्रसंगी काशीनाथ बारी ,श्रीरंग वाघ, पंडीत गुरव, विजय प्रजापती , सुनिल माळी, हिरामण कुंभार ,बापू कोळी, श्रीराजू पाचपांडे, श्रीराजू टेलर, अशोक चव्हाण ,अरूण चौधरी , मनोज येवले ,बंगले सर,रविंद्र तळेले,भागवत ढाके,किशोर लोहार, रमेश मोरे,नामदेव बारी,गोपाळ कोळी, प्रदीप महाजन, विठ्ठलराव कदम आदींनी रोज उपस्थिती दिली.
महिलांमधये सौ.चंद्रभागा वाघ, सुभद्राबाई, सरस्वतीबाई, आशाबाई पाटील, शोभाताई माळी, यावल पाटील, सुरेखा गजेशवर, रूपाली चव्हाण, योगिता यादव, सुनिता वानखेडे ,निशा प्रजापती,विद्या महाजन ,सुरेखा बारी,शितल वाघ ज्योति वाघ, ऊषाबाई चौधरी या काकडा आरतीत सहभागी झाल्या.
कार्यक्रम यशस्वीतेसाठी रमेश बोंडे, गुरव अप्पा ,काशीनाथ बारी ,श्रीविजय प्रजापती यांनी विषेश सहकार्य केले. नितीन महाजन , पिंटू सोनार प्रमोद गडे,सुनिल भोईटे,विकास गुरव, रामभाऊ करांचे,यशवंत सोनवणे ,चेतन चौधरी,नाना घोडके,राकेश कोलते,चंद्रकांत देशमुख यांनी हजर राहून सहकार्य केले. प्रसादानंतर कार्यक्रमाचे समारोप झाले, यावेळी रमेश बोंडे यांनी सर्वांचे आभार मानले.