जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | देशभरात ७ मे रोजी आज लोकसभा निवडणूकीच्या तिसऱ्या टप्प्यासाठी मतदान होत आहे. या तिसऱ्या टप्प्यात ९३ जागांवर मतदान होणार आहे. महाराष्ट्रात ११ जागावर मतदान आहे. महाराष्ट्रातील 11 लोकसभा जागांतून 519 उमेदवारी अर्ज आल्याचे निवडणूक आयोगाकडून समजले आहे.
महाराष्ट्रात बारामतीमध्ये महाविकास आघाडीकडून सुप्रिया सुळे विरूध्द महायुतीकडून सुनेत्रा पवार, सांगलीमध्ये महायुतीकडून संजयकाका पाटील – महाविकास आघाडीकडून चंद्रहार पाटील आणि काँग्रेसचे बंडखोर उमेदवार विशाल पाटील यांची तिरंगी, रत्नागिरी-सिंधूदूर्गमध्ये महाविकास आघाडीकडून विनायक राऊत विरूध्द महायुतीकडून नारायण राणे, कोल्हापूरमध्ये महाविकास आघाडीकडून शाहू महाराज विरूध्द महायुतीकडून संजय मंडलिक, माढामध्ये महाविकास आघाडीकडून धैर्यशिल मोहिते पाटील विरूध्द महायुतीकडून रणजितसिंह निंबाळकर, हातकणंगलेमध्ये महायुतीकडून धैर्यशिल माने, महाविकास आघाडीकडून सत्यजित पाटील सरूडकर आणि स्वामीमान पक्षाचे राजू शेट्टी असे सामने राज्यात तिसऱ्या टप्प्यात होणार आहे.