जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी |भारत सरकार युवा व क्रीडा मंत्रालय, राष्ट्रीय सेवा योजना प्रादेशिक कार्यालय, पुणे तसेच राष्ट्रीय सेवा योजना कक्ष आणि कवयित्री चहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगाव येथील सामाजिकशास्त्रे प्रशाळेतील समाजकार्य विभाग राष्ट्रीय सेवा योजना एकक यांच्या संयुक्त विद्यमाने दि. ३० मार्च रोजी स्वच्छता कृती योजना (SAP) अंतर्गत “स्वच्छता अभियान आणि शहीद दिनानिमित मतदान जनजागृती कार्यक्रम आयोजिन” करण्यात आले.
या प्रसंगी समाजकल्याण, जळगाव येथील सहायक आयुक्त तथा नोडल अधिकारी (SVEEP), योगेश पाटील तसेच जिल्हा अधिकारी कार्यालय, जळगाव येथील जिल्हा माहिती अधिकारी तथा नोडल अधिकारी मिडीया कक्ष, युवराज पाटील त्याच बरोबर भारत सस्कारच्या स्वच्छ भारत अभियान कार्यक्रमाचे ब्रॉड अम्बेसिडर रणजितसिंग राजपुत, जळगाव माय रेडीओचे RJ देवा व RJ शिवनी तसेच विद्यापीठाच्या राष्ट्रीय सेवा योजना कक्षाचे संचालक डॉ. सचिन जे. नांद्रे यांची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थान सामाजि शास्त्रे प्रशाळेचे प्रभारी संचालक प्रा. डॉ. अजय एस. पाटील यांनी भूषविले.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला समाजकार्य विभागाच्या विद्यार्थ्यांनी सहा. प्रा. योगेश माळी माच्या मार्गदर्शना खाली पाथनाट्याच्या माध्यमातून मतदन जनजागृतीचा संदेश दिला. त्यानंतर उपस्थित मान्यवरांच्या समोर प्रशाळेतील विद्यार्थांनी सहा. प्रा.रोशन मावळे व प्रदीप गोफणे यांच्या मार्गदर्शनाखाली ‘ओट फॉर बेटर इंडिया’ हा संदेश देणाऱ्या भिंत्रीपात्रकाचे सादरीकरण केले.
या नंतर मान्यवरांच्या हस्ते कवयित्री बहिणाबाई चौधरी यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून व दिप प्रज्वलन करून कार्यक्रमाचे उद् घाटन करण्यात आले. या प्रसंगी कार्यक्रमाचे प्रास्ताविक विद्यापीठाच्या राष्ट्रीय सेवा योजना कक्षाचे संचालक डॉ. राचिन जे नांदे यांन केले. तद् नंतर विद्यार्थ्यांशी संवाद साधताना रणजितसिंग राजपुत यांनी मतदानाचा टक्का वाढविण्याकरिता शासनाच्या विविध योजनाच्या आधारे मतदानाचा टक्का वाढविण्यासाठी केलेल्या प्रयत्नांचा व प्रसंगांचा उजाळा देत नवमातदार नोंदणीकरिता विद्यार्थ्यांना प्रोत्साहित केले.
याप्रसंगी कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणूल बोलतांना युवराज पाटील, जिल्हा माहिती अधिकारी तथा नोडल अधिकारी मिडीया कक्ष, जिल्हा अधिकारी कार्यालय, जळगाव यांनी प्राचीन काळातील जनपद-महाजनपद कालखंडाचे दाखले देत भारयातील लोकशाही प्रणालीचा उलगडा केला व लोकाहाशी बळकटीकरणासाठी युवकांची भूमिका अधोरेखित केली. यानंतर जळगाव माय रेडिओचे रेडिओ जॉकी RJ देवा व J शिवानी यांनी आपल्या RJ शैलीत उपस्थित युवकांशी संवाद साधला. या प्रसंगी डॉ. विजय घोरपडे यांनी कार्यक्रमाचे सुत्रसंचालन करून उपस्थितांना मतदानाची शपथ दिली. डॉ. मनोज इंगोले यांनी उपस्थितांचे आभार मानले व राष्ट्रगीताने कार्यक्रमाती सांगता करण्यात आली.