भुसावळ, प्रतिनिधी | शहरामध्ये भारतीय जनता पार्टीच्या वतीने मतदार नोंदणी व भाजपा सदस्य नोंदणी अभियान सुरू झाले आहे. आपले नाव मतदार यादीमध्ये नोंदवण्याची सुवर्णसंधी भारतीय जनता पार्टीच्या वतीने देण्यात आलेली आहे.
या कार्यक्रमाचा कालावधी दिनांक १ जुलै ते १ ऑगस्ट २०१९ पर्यंत आहे. मतदार नोंदणीसाठी आवश्यक कागदपत्रे वयाचा पुरावा शाळा सोडल्याचा दाखला किंवा जन्मदाखला, रहिवासाचा पुरावा शिधापत्रिका, वीज बिलाची प्रत, तलाठी यांचा रहिवासी दाखला, आधार कार्ड प्रत, पासपोर्ट फोटो एक, नववधू मतदारांसाठी लग्नपत्रिका किंवा विवाह नोंदणीचा दाखला, योग्य वधू-वर नाव नोंदणीसाठी कुटुंबातील एका व्यक्तीच्या निवडणूक कार्डाची प्रत, अशी कागदपत्रे मतदार आवश्यक असल्याची माहिती नगरसेवक युवराज लोणारी यांनी यावेळी दिली. या कार्यक्रमप्रसंगी आमदार संजय सावकारे, सुनील नेवे, नगराध्यक्ष रमण भोळे, युवराज लोणारी, बीजेपी शहर अध्यक्ष पुरुषोत्तम नारखेडे, पिंटू कोठारी, अमोल इंगळे, पिंटू ठाकूर, विजय मोतीराम चौधरी, नारायण कोळी, परिक्षीत बऱ्हाटे, राजू नाटकर, प्रमोद सावकारे यांच्यासह बहुसंख्येने कार्यकर्ते व नागरिक उपस्थित होते. आ. सावकारे यांनी सदस्य नोंदणीसाठी मोबाईलद्वारे कशाप्रकारे नोंदणी केली जाईल, याची माहिती नागरिकांना साध्या भाषेत समजून सांगितली. यावेळी नोंदणीसाठी बऱ्याच लोकांची गर्दीही झाली होती. नवतरुण व तरुणींनी ह्या वेळी नोंदणी कार्यक्रमाचा लाभ घेतला. हा कार्यक्रम आ. सावकारे यांच्या जनसंपर्क कार्यालयात पार पडला.