जामनेर, प्रतिनिधी | भारत सरकारच्या सूचना व प्रसारण मंत्रालय, रिजनल आऊटरिज ब्युरो,गीत व नाटक विभाग महाराष्ट्र व गोवा व भारत निवडणूक आयोग यांच्या संयुक्त विद्यमाने लोकरंजन बहुउद्देशीय संस्था, जामनेर यांच्या वतीने शहरात मतदार जागृतीवर पथनाट्य सादर करण्यात आले.
जामनेर शहरात माझ मत माझा महाराष्ट्र या अभियानानुसार मतदार जागृतीसाठी संतोष सराफ व सहकारी यांनी या पथनाट्य सादर केले. कार्यक्रमाचे उद्घाटन निवडणूक निर्णय अधिकारी प्रसाद मते तसेच तहसीलदार अरूण शेवाळे, पोलीस निरीक्षक यांनी केले. जामनेर शहरात महाविद्यालय व महत्वाचे चौकात मतदान करण्याची टक्केवारी वाढविण्याचे आवाहन करण्यात आले.