पारोळा प्रतिनिधी । तालुक्यातील एन.इ.एस.गर्ल्स विद्यालयात आज येत्या २१ ऑक्टोबर रोजी होणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मतदार जनजागृती अभियान रॅली काढण्यात आली
मतदारांनी लोकशाही भक्कम करण्यासाठी आपल्या राजकीय मतदानाचा अधिकार बजवावा, असे आवाहन शिक्षक व विद्यार्थिनींनी मतदान जनजागृती अभियान रॅली व्दारे केलं. या शोभायात्रेप्रसंगी मुलींनी मतदार जनजागृती संदर्भात विविध घोषणा दिल्या. यात, सबकी सुने सभी को जाने, निर्णय अपना मन का माने, “मतदान करा लोकशाही सुदृढ करा,” “मताची किंमत नाही घेणार, मत मात्र देणार” , वृध्द असो किंवा जवान सर्वजण करा मतदान, लोकशक्ती को लाना है, देश को बचाना है, छोड के अपने सारे काम, पहले चलो करे मतदान’. “आपका मतदान लोकतंत्र की जान”, याचबरोबर पथनाटय, निबंध स्पर्धा, रांगोळी स्पर्धा, वत्कृत्व यातून जनजागृती करण्यात आली.
कार्यक्रमाप्रसंगी मुख्याध्यापिका नंदिनी मोराणकर, पर्यवेक्षक दिलिप भावसार, शिक्षण विभागाच्या समावेश तज्ञ नंदादेवी पाटील, केंद्रप्रमुख गोविंद मिस्तरी, विषय तज्ञ सुधीर सरदार, विशेष शिक्षक नितेश निकम, जितेंद्र वाघ, आधार बि-हाडे, सतिष वाघ, चंद्रकांत वाणी, भास्कर खैरनार, संजिव चौधरी, जाकिर शेख, धर्मेंद्र शिरोळे, सचिन पाटील, रविंद्र ठाकरे, तिरुमल डुडवे, संकेत कोळपकर, दिपक पाटील, सुनिल झडप, मिलिंद मोरे, सरला अमृतकार, सरिता पाटील, स्मृती देशमुख, योजना देशमुख, सुनिता देसाई, प्रतिभा भोई, उज्वला मोरे, रूपाली कोठावदे आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक रूपाली कोठावदे यांनी तर सुत्रसंचालन यु आर मोरे यांनी केले