यावल प्रतिनिधी | यावल येथील कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना विभागामार्फत मतदान जनजागृती व मतदार नोंदणी अभियान राबविण्यात आले.
जळगाव जिल्हा मराठा विद्या प्रसारक समाजाचे यावल येथील महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना विभागामार्फत मतदान जनजागृती व मतदार नोंदणी अभियान प्र.प्राचार्य डॉ.संध्या सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात आले.
या कार्यक्रमात महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा.एम.डी.खैरनार यांनी अध्यक्षस्थान भूषविले तर प्रमुख वक्ते म्हणून यावल तहसीलचे नायब तहसीलदार राहुल सोनवणे उपप्राचार्य प्रा.ए.पी.पाटील, प्रा.संजय पाटील, ब्रँड ॲम्बेसिडर सोनाली रोटे, मतदार नोंदणी साहाय्यक पराग सरोदे आदी उपस्थित होते.
प्रा.खैरनार यांनी, “भारत देश हा लोकशाहीप्रधान देश असून लोकशाही प्रबळ करण्यासाठी मतदारांमध्ये मतदानाबाबत जागृती होणे आवश्यक आहे. प्रत्येक मतदाराने आपला मतदानाचा हक्क बजावला पाहिजे.असे प्रतिपादन केले.
सोनवणे यांनी मतदार नोंदणी व त्यासाठी लागणारे कागदपत्र यांची पूर्ण माहिती दिली. कार्यक्रमानंतर वय 18 वर्ष पूर्ण झालेल्या विद्यार्थ्यांची मतदार नोंदणी करण्यात आली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी प्रा.आर. डी.पवार व सूत्रसंचालन प्रा. मनोज पाटील यांनी केले तर आभार विद्यार्थी विभाग विकास अधिकारी प्रा.डॉ.एस.पी.कापडे यांनी मानले.
कार्यक्रम यशस्वीतेसाठी सौ. डॉ. सुधा खराटे, प्रा . मुकेश येवले, प्रा एस आर गायकवाड, प्रा. डॉ. एच. जी. भंगाळे एस. व्ही. चव्हाण, श्री डी. एन. मोरे, व्ही. व्ही. पाटील तसेच शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी सहकार्य केले.