मुंबई, वृत्तसंस्था | दूरसंचार क्षेत्रातील आघाडीची कंपनी असलेल्या व्होडाफोनच्या सर्व्हिसमुळे ग्राहकांमधून संताप व्यक्त केला जात आहे. व्होडाफोन ग्राहकांना रविवारी अचानक कॉलिंगसह इंटरनेटसेवा वापरण्यात अडचणी येण्यास सुरूवात झाली. ग्राहकांनी ट्विटरवरून व्होडाफोन नेटवर्कबद्दल #Vodafonedown हॅशटॅग वापरून तक्रारी करण्यास सुरूवात केली.
व्होडाफोनची सर्व्हिस डाऊन झाल्याने कंपनीचे अनेक ग्राहक त्रस्त झाले. रविवारी सकाळपासून ग्राहकांना ही समस्या जाणवू लागली. अनेक ग्राहकांना नेटवर्कची समस्या भेडसावत आहेत. कॉलिंगसह डाटाही वापरता येत नसल्याच्या तक्रारी काही ग्राहकांनी केल्या आहेत. विशेष म्हणजे देशातील बऱ्याच शहरात ही समस्या जाणवू लागली आहे. त्यावर आता मिम्सही व्हायरल होऊ लागले आहेत.व्होडाफोनच्या सर्व्हिसबद्दल अनेक तक्रारी केल्या जात आहे. लखनऊ, अहमदाबाद, गुजरातमधूनही ट्विटरवर तक्रारी केल्या जात आहे.