विवाहितेचा विनयभंग करून जीवेठार मारण्याची धमकी

 

चाळीसगाव प्रतिनिधी । तालुक्यातील एका गावात २८ वर्षीय विवाहितेला जीवे ठार मारण्याची धमकी देत विनयभंग केल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी चाळीसगाव ग्रामीण पोलीस ठाण्यात एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

चाळीसगाव ग्रामीण पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चाळीसगाव तालुक्यातील एका गावात राहणारी २८ वर्षीय विवाहित आपल्या कुटुंबियांसह वास्तव्याला आहे. शुक्रवार 10 डिसेंबर रोजी सायंकाळी सात वाजेच्या सुमारास विवाहिता घरात स्वयंपाक करीत असताना गावातील संशयित आरोपी महेंद्र सिताराम साळुंके हा अनाधिकृतपणे विवाहितेच्या घरात प्रवेश केला. विवाहितेला लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य करत ‘तू माझ्यासोबत चाल, तू जर माझ्यासोबत आले नाही तर मी तुला संसार होऊ देणार नाही व तुला जिवंत राहू देणार नाही’ अशी धमकी देऊन विवाहितेच्या आई-वडिलांना शिवीगाळ केली. याप्रकरणी विवाहितेने चाळीसगाव ग्रामीण पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्यांच्या तक्रारीवरून संशयित आरोपी महेंद्र साळुंखे यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक फौजदार अविनाश पाटील करीत आहे.

Protected Content